Election: यूपी निवडणुकीत एकनाथ शिंदेंची एन्ट्री! ३५ जागांवर उमेदवार देण्याची तयारी; भाजपची डोकेदुखी वाढणार?

Uttar Pradesh Elections: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उत्तर प्रदेशमध्ये निवडुकीच्या रिंगणात उतरणार आहे. विधानसभेच्या ३५ जागांवर ते उमेदवार देणार आहेत.
Election: यूपी निवडणुकीत एकनाथ शिंदेंची एन्ट्री! ३५ जागांवर उमेदवार देण्याची तयारी; भाजपची डोकेदुखी वाढणार?
Uttar Pradesh Elections:Saam Tv
Published On: 

सूरज मसूरकर, मुंबई

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. कारण एकनाथ शिंदे आता भाजपला टक्कर देणार आहेत. उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. या निवडणुकीमध्ये शिंदेंची शिवसेना उमेदवार उतरवणार आहेत. त्यामुळे फक्त भाजपच नाही तर उत्तर प्रदेशमधील मोठ्या पक्षांचे टेन्शन वाढणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशात शिंदेंची शिवसेना निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. उत्तर प्रदेशात ३५ विधानसभा जागांवर शिंदेसेना उमेदवार देण्याची तयारी करत आहे. या निवडणुकीत शिंदे गटाचा हिंदुत्वाचा अजेंडा असेल. प्रयागराजमध्ये राष्ट्रीय सचिव कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी याबाबत मोठी घोषणा केली. महाराष्ट्रात भाजपसोबत पण यूपीमध्ये स्वतंत्र राजकीय भूमिका शिवसेना घेणार आहे.

Election: यूपी निवडणुकीत एकनाथ शिंदेंची एन्ट्री! ३५ जागांवर उमेदवार देण्याची तयारी; भाजपची डोकेदुखी वाढणार?
Maharashtra Politics: शिंदेंचा नेता म्हणाला, सुरतवरून आलेल्या आमदाराचं रामनाम सत्य होणार होतं; ठाकरेंच्या विश्वासू शिलेदाराचं प्रत्युत्तर

शिवसेना शिंदेगटाचे नेते अभिजीत अडसूळ यांनी मथुरा मुद्द्यावर सांगितले की, 'मथुरा भाजपचा मुद्दा, शिवसेनेचा मुद्दा हिंदुत्व', असणार आहे. या निवडणूक शिंदेसेना भाजपला तगडी फाइट देणार असल्याची चर्चा सध्या होत आहे. उत्तर प्रदेशच्या राजकारणात शिंदे गटाच्या एन्ट्रीमुळे नवे राजकीय समीकरण तयार होणार का? यावर आता चर्चा सुरू झाली आहे. शिंदेंच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

Election: यूपी निवडणुकीत एकनाथ शिंदेंची एन्ट्री! ३५ जागांवर उमेदवार देण्याची तयारी; भाजपची डोकेदुखी वाढणार?
Trisha Krishnan Politics: मुख्यमंत्री विजय यांच्यानंतर आता त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? जयललितांशी होतेय तुलना!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.