Maharashtra Politics: शिंदेंचा नेता म्हणाला, सुरतवरून आलेल्या आमदाराचं रामनाम सत्य होणार होतं; ठाकरेंच्या विश्वासू शिलेदाराचं प्रत्युत्तर

kailash Patil On Sanjay Shirsat: शिंदेंचा नेता आणि ठाकरेंच्या आमदारामध्ये जुंपली आहे. शिंदेंच्या नेत्याने ठाकरेंच्या आमदाराबाबत मोठा गौप्यस्फोट केला. त्याला ठाकरेंच्या आमदाराने प्रत्युत्तर दिलं.
Maharashtra Politics: शिंदेंचा नेता म्हणाला, सुरतवरून आलेल्या आमदाराचं रामनाम सत्य होणार होतं; ठाकरेंच्या विश्वासू शिलेदाराचं प्रत्युत्तर
Maharashtra PoliticsSaam tv
Published On: 

शिवसेना शिंदेगटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलेल्या विधानाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. बडांच्यावेळी माहिती देताना संजय शिरसाट यांनी मोठा गौप्यस्फोट केला. सुरतच्या बॉर्डरवरून परतणाऱ्या आमादाराचं रामनाम सत्य झालं असतं, असं ते म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर ठाकरेंचे धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. 'तो आमदार मीच आहे का याचं स्पष्टीकरण शिरसाट यांनीच दिलं पाहिजे. राजकारण कुठल्या थराला जात आहे हे सरकारने पाहिले पाहिजे. या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

संजय शिरसाट यांनी केलेल्या विधानानंतर कैलास पाटील यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. गृहमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावे असं देखील ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, 'सूरत बॉर्डरवरुन परत येणारा आमदार मी होतो. आता माझ्या जीवाला धोका नाही. पण कुणाच्या मनात काय चालले आहे किंवा सत्ता मिळवण्यासाठी कोण काय करू शकतं हे मला कालच्या त्यांच्या विधानाने महाराष्ट्राला कळालं आहे. परत येत असताना मला जाणीव होती कोणत्याही स्तराला जाऊ शकतात. राज्याचे मंत्री उघडपणे असं बोलत असतील तर त्यांच्यात हिंमत कुठून येते. सत्तेच्या जीवावर आपलं काहीही होऊ शकत नाही ही हिम्मत या लोकांमध्ये आहे. मुख्यमंत्री यांनी त्यावेळी घडलेल्या प्रकरणाची चौकशी करावी आणि सत्य बाहेर आणावे. घटनेला ४ वर्षे झाले मी तक्रार करणार नाही. पण मुख्यमंत्री चौकशी करावी अशी मागणी करणार आहे. जीवाची भीती मला कालही नव्हती आणि आजही नाही.'

Maharashtra Politics: शिंदेंचा नेता म्हणाला, सुरतवरून आलेल्या आमदाराचं रामनाम सत्य होणार होतं; ठाकरेंच्या विश्वासू शिलेदाराचं प्रत्युत्तर
Maharashtra Politics: मोठी बातमी! भाजपमध्ये हालचालींना वेग, रात्री पार पडली मंत्र्यांची महत्वाची बैठक

संजय शिरसाट यांनी देखील यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'ही गेल्या उठावाची घटना आहे. त्यावर आता बोलणे योग्य नाही. जो आमदार होता तो आमच्या ग्रुपमधून निसटला होता. म्हणून मी बोललो होतो. आम्ही सर्वजण सुरतला चाललो होतो, ते पलीकडील ट्रॅक वर गेले होते. आम्ही जर जबरदस्ती केली असती तर काहीही झालं असते. मात्र आम्ही जाऊ दिले. तशी काही कल्पना आमच्या डोक्यात नव्हती. एकाने शिंदेंना सांगितले घरचे आजारी आहे. त्यांनी विमान करून दिले, त्यांनी मोकळ्या मनाने काम केले. त्या दरम्यान काही आमदार आम्हाला येऊन भेटले. राम नाम सत्य झालं असते असे मी सांगितले होते. एकटा माणूस जाणार होता म्हणून मी सांगितले.'

Maharashtra Politics: शिंदेंचा नेता म्हणाला, सुरतवरून आलेल्या आमदाराचं रामनाम सत्य होणार होतं; ठाकरेंच्या विश्वासू शिलेदाराचं प्रत्युत्तर
Maharashtra Politics: राज्यातील राजकरणात मोठी घडामोड; भाजपच्या बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

दरम्यान, आमदार कैलास पाटील यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेने केली. मंत्री संजय शिरसाट यांच्या पॉडकास्ट मुलाखतीचा संदर्भ देत ठाकरे गटाने कळंब उपविभागीय अधिकाऱ्यांकडे मागणी केली. संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यातील आमदार हे कैलास पाटीलच असल्याचा शिवसैनिकांचा दावा आहे. राजकीय सत्ता संघर्षातुन निर्माण झालेल्या द्वेषातून आमदार कैलास पाटलांच्या जिवाला धोका असल्याची शिवसैनिकांमध्ये भिती आहे. कैलास पाटील हे लोकप्रिय आमदार असून सातत्याने लोकांत वावरतात, दौऱ्यात असतात त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आणि संवेदनशील आहे. कैलास पाटलांच्या सुरक्षेबाबत कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्याची शिवसैनिकांची मागणी आहे.

Maharashtra Politics: शिंदेंचा नेता म्हणाला, सुरतवरून आलेल्या आमदाराचं रामनाम सत्य होणार होतं; ठाकरेंच्या विश्वासू शिलेदाराचं प्रत्युत्तर
Maharashtra Politics: विधानसभा अध्यक्षांनी आदिवासींच्या जमिनी बळकावल्या, चौकशी करा; संजय राऊतांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.