संजय शिरसाटांच्या घरावर बाटलीफेक; पोलीस प्रशासनाच्या कारभारवर शिरसाट संतप्त

Sanjay Shirsat Slams Police After Attack: छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांच्या घरावर काही तरुणांनी हल्ला केलाय...मात्र या हल्ल्यामागचा उद्देश नेमका काय होता? शिरसाटांनी पोलिस प्रशासनाच्या कारभारावर कसा संताप व्यक्त केलाय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
SANJAY SHIRSAT HOUSE ATTACK
SANJAY SHIRSAT HOUSE ATTACKsaam tv
Published On: 

हा व्हिडिओ आहे... छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्याबाहेर धुडगूस घालणाऱ्या हल्लेखोरांचा...."अनेक ओएसडी (OSD) माझ्या खिशात आहेत, अशी धमकी देत.. या हल्लेखोरांनी शिरसाटांच्या बंगल्यावर दारूच्या बाटल्या फेकल्या...आणि पालकमंत्र्यांच्या घरावर दिवसाढवळ्या झालेल्या या हल्ल्यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय..हल्लेखोरांनी शिरसाटांच्या घरावर दारूच्या बाटल्या फेकल्यानंतर सुरक्षारक्षक आणि मद्यपींमध्ये जोरदार झटापट झाली, ज्यात एक सुरक्षा रक्षक किरकोळ जखमी झालाय... .खुद्द पालकमंत्र्यांनीच आपल्या घरावरील हल्ल्यानंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला...त्यात पोलिसांनी या प्रकरणी तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या.

दुसरीकडे शिरसाटांच्या घरावर तिसऱ्यांदा हल्ला झाल्यानं शिरसाटांच्या घरात दरोडा घालण्यासारखं काय होतं? अशी खोचक टोला संजय राऊतांनी शिरसाटांना लगावलाय... मात्र तुम्हीच दरोडेखोर आहात? असा टोला शिरसाटांनी राऊतांना लगावलाय...

मात्र या हल्ल्यानंतर राजकीय वातावरण चांगलचं तापलयं... या हल्ल्ल्यामागचा उद्देश शोधून काढला पाहिजे, यात पोलिस अधिकाऱ्यांचाही समावेश असेल तर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, अशी मागणी मंत्री उदय सामंतांनी केलीय...राज्याच्या पालकमंत्र्यांच्याच निवासस्थानाबाहेर मद्यपी असा हल्ला करत असतील तर इतकी हिंमत येते कुठून? पोलीस यंत्रणेवर खुद्द मंत्र्यांनाच अविश्वास दाखवला असेल तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वसामान्य जनतेला पोलिस प्रशासन कसं निर्भय बनवणार? हा खरा प्रश्न आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.