Maharashtra Politics: विधानसभा अध्यक्षांनी आदिवासींच्या जमिनी बळकावल्या, चौकशी करा; संजय राऊतांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

Sanjay Raut On Rahul Narvekar: संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केले. विधानसभा अध्यक्षांनी आदिवासींच्या जमिनी बळकावल्या असल्याचे विधान त्यांनी केले. त्यांच्या या विधानामुळे राजकारण तापले.
Maharashtra Politics: विधानसभा अध्यक्षांनी आदिवासींच्या जमिनी बळकावल्या, चौकशी करा; संजय राऊतांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
Sanjay Raut On Rahul NarvekarSaam Tv
Published On: 

शिवसेना ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कथित जमीन खरेदी व्यवहाराची आणि गरीब आदिवासींच्या जमिनी बळकावल्याच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली. या पत्रात अलिबाग तालुक्यातील, रायगड जिल्ह्यातील खडाळे गावातील सुमारे २० आदिवासी कुटुंबांचा प्रश्न मांडला आहे. घरे पाडून वीज-पाणी तोडल्याने त्यांना विस्थापित केल्याचा आरोप आहे.

संबंधित जमीन राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या पत्नी सरोजिनी राहुल नार्वेकर यांच्या नावे खरेदी केल्याचा दावा पत्रात केला आहे. नार्वेकर व त्यांचे नातेवाईक बंधू मकरंद यांनी आणखी जमीन खरेदीसाठी आदिवासींवर पोलिसांमार्फत दबाव आणल्याचाही आरोप आहे. आदिवासी कुटुंबांचे संरक्षण करून त्यांचे संपूर्ण पुनर्वसन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

Maharashtra Politics: विधानसभा अध्यक्षांनी आदिवासींच्या जमिनी बळकावल्या, चौकशी करा; संजय राऊतांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
Sanjay Raut: नागपूरचे नाव बदलून दीक्षाभूमी करा! संजय राऊतांची मोठी मागणी

यासंदर्भात संजय राऊत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी सांविधानिक पदावर काम करणाऱ्या व्यक्तीने कसं वागू नये याचे हे ऊत्तम उदाहरण आहे. अलिबाग तालुक्यातील आदिवासींच्या जमीनींवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून बेकायदेशीर पद्धतीने अतिक्रमण करण्यात येत असल्याचा आरोप सतत करण्यात आला आहे. आदिवासी त्यांच्या जमीन घरांसाठी आंदोलन करत असताना सरकार कुठे आहे? कोणाच्या बाजूने आहे?, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

Maharashtra Politics: विधानसभा अध्यक्षांनी आदिवासींच्या जमिनी बळकावल्या, चौकशी करा; संजय राऊतांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
Maharashtra Politics: शिंदेसेनेकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, बडा नेता आज 'धनुष्यबाण' घेणार हाती

संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, 'नार्वेकर हे संविधानिक पदावर असून पदाचा गैरवापर करत आहेत. पोलिस, महसूल, नगर विकास विभागावर दबाव टाकत आहेत. अलिबाग मधले प्रकरण २० आदिवासींच्या जमिनी घरं विकत घेतली. सरकारी योजनेतून बांधलेली ती घरं आहेत. ती विकत घेता येत नाहीत. नार्वेकरांचा एजंट पाटीलने बुलडोजरने घर पाडली.'

Maharashtra Politics: विधानसभा अध्यक्षांनी आदिवासींच्या जमिनी बळकावल्या, चौकशी करा; संजय राऊतांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
Maharashtra Politics: माजी मुख्यमंत्र्यांसह ४ आमदारांना जीवे मारण्याची धमकी, राजकीय वर्तुळात खळबळ

संजय राऊत यांनी चौकशीची मागणी केली. 'मुख्यमंत्र्यांनी ५०० एसआयटी स्थापन केल्यात तर या प्रकरणात एसआयटी स्थापन करावी. महापालिका निवडणूक वेळी ही नार्वेकरांनी दादागिरी केल्या व्हिडिओ आलेला. अशा व्यक्तीने विधानसभेच्या पिठासीन पदावर बसणं राज्यासाठी धोका आहे. आदीवासींच आंदोलन दडपलं जातं. विधानसभा अध्यक्ष म्हणून आदिवासींच्या जमिनी विकत घ्यायचा अधिकार आहे का? आदिवासींच्या हक्कांचा खून करण्यासारखा आहे. माणुसकी मेली आहे. विरोधी पक्षाची दखल घेतली नाही तरी विपक्षने काम करत राहिलं पाहिजे. सरकारच्या प्रत्येक कृतीतून महाराष्ट्राची बदनामी होतेय.'

Maharashtra Politics: विधानसभा अध्यक्षांनी आदिवासींच्या जमिनी बळकावल्या, चौकशी करा; संजय राऊतांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
Maharashtra Politics: राज्यातील राजकरणात मोठी घडामोड; भाजपच्या बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.