Maharashtra Politics: माजी मुख्यमंत्र्यांसह ४ आमदारांना जीवे मारण्याची धमकी, राजकीय वर्तुळात खळबळ

Ashok Chavan Receive Death Threats: भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह नांदेडच्या ४ आमदारांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
Maharashtra Politics: माजी मुख्यमंत्र्यांसह ४ आमदारांना जीवे मारण्याची धमकी, राजकीय वर्तुळात खळबळ
Ashok Chavan Receive Death ThreatsSaam Tv
Published On: 

नांदेड संजय सूर्यवंशी

राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. माजी मुख्यमंत्र्यासह ४ आमदारांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांच्यासह ४ आमदारांना उडून देण्याची धमकी आली. धमकी देणाऱ्याला मुंबई येथील भारतीय चित्रपट राष्ट्रीय संग्रहालयातून अटक करण्यात आली आहे. आरोपी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि नांदेड जिल्ह्यातील ४ आमदारांना उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. जीवे मारण्याची देण्याची धमकी देत एका व्यापाऱ्याकडे १ लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा आरोपीने प्रयत्न केला आहे. आरोपीला मुंबई येथील भारतीय चित्रपट राष्ट्रीय संग्रहालयातून नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. रवी उर्फ रवींद्र गौतम रोकडे असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा बीड जिल्ह्यातील आष्टा या गावातील रहिवासी असून तो सध्या नांदेडमध्ये वास्तव्यास आहे.

आरोपी रवी रोकडे हा चित्रपट क्षेत्रात दिग्दर्शक असल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी नांदेडच्या वजीराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश तुतारे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रोकडेने व्यावसायिक महेश सुतारे यांच्याकडे एक लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्याने संतापून आरोपी रोकडेने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि नांदेड जिल्ह्यातील चार आमदारांना एकाच दिवशी उडवण्याचा प्लॅन केला होता.

'माझ्या पाठीशी मोठ्या लोकांचे हात असून संपूर्ण नांदेड जिल्हा माझे काहीच बिघडू शकत नाही.' अशी धमकी आरोपी रोकडे यांनी व्यावसायिक महेश सुतारे यांना दिली. धमकी देणाऱ्या आरोपीला नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई येथून अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आता पोलिस करीत आहे. पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.