काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी १६ नोव्हेंबर रोजी ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्राचं प्रकाशन केलं. मात्र, या पुस्तकावरून आता राजकीय वाद निर्माण झाला आहे. या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण असल्याचा आरोप शिंदेसेनेने केला आहे. या पुस्तकाचा निषेध करण्यासाठी शिंदेसेनेच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत सोनिया गांधी यांचं पुस्तक फाडलं. सोनिया गांधी यांनी पुस्तकात सावरकर हे सातत्याने ब्रिटिश सरकारकडे माफी मागत असल्याचा उल्लेख केल्याचं शीतल म्हात्रे यांनी सांगितलं.
तसंच, उद्धव ठाकरे यांनी हे पुस्तक स्वीकारल्याचा दावा करत शीतल म्हात्रे यांनी त्यांना थेट सवाल केला आहे. सोनिया गांधी यांच्या पुस्तकातील लिखाण तुम्हाला मान्य आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला. सावरकरांचा अपमान म्हणजे जनतेचा अपमान आहे, असंही त्या म्हणाल्या. बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसच्या भूमिकेचा निषेध करत जोडे मारले होते. मग उद्धव ठाकरे आता काय करणार? तेही काँग्रेसचा निषेध करणार का? असा सवाल शीतल म्हात्रे यांनी उपस्थित केला. तसेच, बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत काँग्रेसच्या एकाही कार्यकर्त्याने ट्वीट केलं नाही, यावरूनही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.