

माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांच्या पक्षांतराची चर्चा
भरत गोगावले यांचे अभिजीत पाटील यांच्याबाबत मोठे विधान
शिवसेना शिंदे गटाकडून राष्ट्रवादीच्या आमदाराला पक्षप्रवेशाची ऑफर
शरद पवार गट राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण माढा विधानसभा मतदारसंघाच्या आमदाराला थेट मंत्रीपदाची ऑफर देण्यात आलीय. ही ऑफर दिलीय, शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी दिलीय. गोगावले यांनी माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांना शिवसेनेत येण्याबरोबर मंत्रीपदाचंही आश्वासन दिलंय. त्यामुळं राजकीय वर्तुळात या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरूय.
अभिजीत पाटील हे माढा विधानसभा मतदारसंघाचे शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार आहेत. सध्या ते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन देखील आहेत. मंत्री भरत गोगावले हे कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात दाखल झाले होते. शुक्रवारी मध्यरात्री राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची सपत्निक शासकीय महापुजा संपन्न झाली.
जेव्हा आपण संकटात असतो त्यावेळी देव उभा राहतो, पण ज्यावेळी देव अडचणीत आला त्यावेळी अभिजीत पाटील यांचे वंशज उभे राहिले, असं मत मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केलं. त्यांना धन्यवाद म्हणत, जर आमच्याकडे येणं झालं तर मंत्रीपदही देऊ शकतो, असे गोगावले जाहीररित्या म्हणाले. गोगावलेंच्या याच विधानाची चर्चा राज्यभरात होतेय.
दरम्यान, आज कार्तिकी एकादशी असून यानिमित्त मोठ्या प्रमाणात वारकरी पंढरपुरात दाखल झालेत. विठुनामाच्या गजरात वारकरी दंग आहेत. उद्या पहाटे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापुजा संपन्न होणार आहे. एकादशीनिमित्त अनेक राजकीय पक्षाचे नेते देखील पंढरपुरात दाखल झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.