भाजपला मोठा राजकीय धक्का; मित्रपक्षाचाच धोबीपछाड, बड्या नेत्यानं पक्षाला ठोकला रामराम

Bihar Politics: बिहारमध्ये निवडणुकीआधी भाजपला धक्का बसला आहे. भागलपूरचे भाजप नेते अश्विनी जोशी ‘माँटी’ यांनी पक्षाला रामराम करत लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) मध्ये प्रवेश केला.
Bjp Leader Ashwini Joshi Quits Party, Joins Ljp RAM Vilas In Bihar
Bjp Leader Ashwini Joshi Quits Party, Joins Ljp RAM Vilas In Biharsaam tv
Published On: 
Summary
  • बिहारमधील भाजपचे नेते अश्विनी जोशी यांचा पक्षाला रामराम

  • भागलपूरमधील भाजप नेत्याचा लोक जनशक्ती पार्टीत प्रवेश

  • निवडणुकीआधी बिहारमध्ये भाजपला मोठा राजकीय धक्का

गेल्या काही दिवासापासून बिहार राज्यातील महायुतीत आलबेल नाहीये. भाजपसाठी संकटमोचक म्हणून काम करणाऱ्या चिराग पासवान यांनी धोबी पछाड करत भाजपला मोठा धक्का दिलाय. चिराग पासवान काही काळापासून भाजपला विरोधातील भूमिका घेत आहेत. त्याच दरम्यान त्यांनी भाजपच्या एका बड्या नेत्याला गळा लावत आपल्या पक्षात सामील करून घेतलंय. बिहारमधील भागलपूरमध्ये भाजपचा बडा नेत्यानं पक्षाला रामराम ठोकत लोक जनशक्ती पार्टीत प्रवेश केलाय.

भाजपचे भागलपूर जिल्हा खजिनदार, महानगरपालिका वॉर्ड नगरसेवक आणि 'एम्पॉवर्ड स्टँडिंग कमिटी'चे (सशक्त स्थायी समिती) सदस्य राहिलेले अश्विनी जोशी 'माँटी' यांनी भाजपला रामराम ठोकलाय. भाजपमधून बाहेर पडल्यानंतरक त्यांनी पाटणा येथे जाऊन लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) मध्ये प्रवेश केलाय. त्यांच्यासोबत त्यांचे अनेक समर्थकही या पक्षात सामील झाले आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुरेंद्र विवेक यांनी त्यांना अधिकृतपणे पक्षात प्रवेश दिला.

Bjp Leader Ashwini Joshi Quits Party, Joins Ljp RAM Vilas In Bihar
जळगाव जिल्हा बँकेत मोठा उलटफेर, ऐनवेळी भाजपच्या माघारीनं राष्ट्रवादीच्या उमेदवाराची बिनविरोध निवड

पाटण्यात आयोजित करण्यात आलेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात अनेक ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये खगरियाचे खासदार राजेश वर्मा, बिहार सरकारचे पीएचईडी (PHED) मंत्री संजय सिंग, ऊस उद्योग मंत्री संजय पासवान, आमदार बाबूलाल शौर्य आणि एलजेपी (रामविलास) च्या राष्ट्रीय प्रवक्त्या यामिनी मिश्रा यांचा समावेश होता.

याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष सुरेंद्र विवेक म्हणाले की, अश्विनी जोशी 'माँटी' यांना सामाजिक आणि राजकीय जीवनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांची संघटनात्मक कौशल्ये, कार्यक्षमता आणि जनतेशी जोडले जाण्याची क्षमता पक्षासाठी अत्यंत मोलाची ठरेल. दरम्यान, खगरियाचे खासदार राजेश वर्मा म्हणाले की, माँटी गेल्या सुमारे २० वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय जीवनात सक्रियपणे आणि समर्पित भावनेने कार्यरत आहेत.

Bjp Leader Ashwini Joshi Quits Party, Joins Ljp RAM Vilas In Bihar
Natasha Awhad:डिलिमिटेशन'वरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वादाची ठिणगी; आव्हाडांच्या पोस्टनं खळबळ

जनतेसोबत त्यांची नाळ जोडलेली आहे. त्यांचा तगडा जनसंपर्क आहे. त्यांच्या नेतृत्त्व गुणांमुळे भागलपूरमधील संघटनेला नवी ताकद मिळेल. अशा उत्साही नेत्यांची भूमिका जिल्हा स्तरावर संघटनेचा विस्तार करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल.

अश्विनी जोशी 'माँटी' यांचा थोडक्यात परिचय

राजकीय वचनबद्धता: अश्विनी जोशी 'माँटी' यांनी स्पष्ट केले आहे की, ते आता एलजेपी (राम विलास) पक्षाच्या माध्यमातून एनडीए (NDA) अधिक बळकट करण्यासाठी काम करतील आणि संघटनेला नव्या उंचीवर नेतील.

महानगरपालिकेतील भूमिका: ते सध्या भागलपूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. ३८ मधून नगरसेवक म्हणून आपला पहिला कार्यकाळ पूर्ण करत आहेत. यासोबतच, ते महानगरपालिकेच्या महत्त्वपूर्ण स्थायी समितीचे सदस्यही आहेत.

भाजप आणि भाजयुमो (BJYM) मधील जबाबदाऱ्या: अश्विनी जोशी मॉँटी यांनी याआधी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा प्रवक्ते आणि जिल्हा खजिनदार म्हणून काम केले आहे; याव्यतिरिक्त, त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चा (BJYM) मध्ये जिल्हा सरचिटणीस आणि प्रदेश कार्यकारी समिती सदस्य ही पदेही भूषवली आहेत.

अश्विनी जोशी माँटी हे भागलपूरचे प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. चेंबर ऑफ कॉमर्स'च्या कार्यकारी समितीचे सदस्य आहेत. याव्यतिरिक्त, ते 'मारवाडी युवा मंच'च्या बिहार राज्य शाखेच्या राजकीय मंचाचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.