Natasha Awhad:डिलिमिटेशन'वरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वादाची ठिणगी; आव्हाडांच्या पोस्टनं खळबळ

Natasha Awhad Opposes Delimitation Bill: डिलिमिटेशन विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देण्याच्या विचारात असल्याच्या चर्चेवर नताशा आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केलीय. त्यांच्या पोस्टमुळे पक्षातील भूमिकेबाबत चर्चा सुरू झाली आहे.
Natasha Awhad Opposes Delimitation Bill:
Natasha Awhad's reaction to the Delimitation Billsaam tv
Published On: 
Summary
  • देशभरात मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशन विधेयकाची चर्चा सुरू आहे.

  • डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्याची शक्यता आहे.

  • या अधिवेशनात सरकार डिलिमिटेशन विधेयक मांडू शकते, असा दावा

मतदारसंघ पुनर्रचना म्हणजेच डिलिमिटेशन विधेयकाची सध्या देशभरात चर्चा सुरूय. संसदेचे हिवाळी अधिवेशन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनादरम्यान सरकार 'परिसीमन विधेयक' मांडू शकते. हे विधेयक मंजूर करण्यासाठी दोन-तृतीयांश बहुमताची आवश्यकता असते.

एप्रिल महिन्यात हे विधेयक सभागृहात मंजूर होऊ शकले नव्हते; मात्र, अलीकडील काही अहवालांनुसार, सरकारकडे आता आवश्यक असलेले दोन-तृतीयांश बहुमत उपलब्ध असल्याचे म्हटले जातंय. मात्र या विधेयकावरून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत वादाची ठिणगी पडल्याचं चित्र आहे.

Natasha Awhad Opposes Delimitation Bill:
राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार की नाही? सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीवर CM फडणवीसांचा मोठा खुलासा!

सुप्रिया सुळे यांनी डिलिमिटेशनला पाठिंबा देण्याबाबत सकारात्मक दर्शवलीय. मात्र डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून शरद पवार गटातील मतभेद उघड झालेत. पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या व पक्षाच्या युवक सरचिटणीस नताशा आव्हाड यांनी 'एक्स'वर पोस्ट करत आपली नाराजी व्यक्त केलीय. माझा पक्ष डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्याचा विचार करत असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य असेल, तर मी या निर्णयाचा तीव्र निषेध करते, असे आव्हाड यांनी म्हटलंय.

मतदारांची वाढती संख्या लक्षात घेता डिलिमिटेशन आवश्यक असले, तरी प्रस्तावित डिलिमिटेशन बिल हे विरोधकांना मिळू शकणाऱ्या जागांची संख्या मर्यादित करण्याचा तसेच भाजपला अनुचित राजकीय फायदा मिळवून देण्याचा घटनाबाह्य प्रयत्न आहे, असं नताशा आव्हाड म्हणाल्या आहेत. भाजपची लोकप्रियता सातत्याने घसरत चाललीय. त्यामुळे सत्तेला चिकटून राहण्यासाठीचा हा त्यांचा शेवटचा केविलवाणा प्रयत्न आहे.

Natasha Awhad Opposes Delimitation Bill:
रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

या देशाची लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाने या बिलाला विरोध केला पाहिजे. या बिलाला पाठिंबा देणं म्हणजे देशाशी आणि देशाच्या संविधानाशी प्रतारणा करण्यासारखंच आहे. पक्षाने आपल्या भूमिकेचा फेरविचार करावा, अशी मला आशा आहे. नैतिकतेचा विजय असो, असे नताशा आव्हाड यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.