

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत माघारीच्या टप्प्यावर मोठ्या राजकीय घडामोडी
अनिल पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांची बिनविरोध निवड झाली.
भाजपच्या उमेदवाराने ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतली.
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत माघारीच्या टप्प्यावर राजकीय घडामोडींना वेग आलाय. निवडणुकीत मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माजी मंत्री अनिल पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांची बिनविरोध निवड झालीय. भाजपच्या उमेदवारानं अचानक माघार घेतल्याने जयश्री पाटील यांची निवड बिनविरोध झालीय. या निवडीमुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री अनिल पाटील यांचे जिल्हा बँकेवर वर्चस्व कायम राहिलंय.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अनिल पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झालीय. अमळनेर विकास सोसायटी मतदारसंघातून भाजपचे प्रतिस्पर्धी उमेदवार प्रफुल्ल पवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने जयश्री पाटील यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिलाय. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अनिल पाटील यांनी पत्नीच्या माध्यमातून आपले वर्चस्व कायम ठेवलंय. माघारीच्या शेवटच्या टप्प्यात आणखी कोणत्या राजकीय घडामोडी घडतात, याकडे आता लक्ष लागलंय.
महायुतीच्या जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच थेट सर्वपक्षीय पॅनलची चर्चा रंगू लागलीय. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात दंड थोपटणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाच्या कुलभूषण पाटलांनी अचानक माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. गुलाबराव पाटील यांच्या विरोधातील जळगाव तालुका विकास सोसायटी मतदारसंघातील उमेदवारी अर्ज कुलभूषण पाटील यांनी मागे घेतला.
त्यामुळे या मतदारसंघातील त्यांचं आव्हान संपुष्टात आलंय. मात्र ओबीसी मतदारसंघातून त्यांची उमेदवारी कायम आहे. तर दुसरीकडे प्रमुख विरोधक आणि अडथळा असलेले कुलभूषण पाटलांच्या माघारीमुळे गुलाबराव पाटील यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय. या माघारीनंतर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये पडद्यामागे काही राजकीय तडजोड झालीय का, अशी चर्चा सुरू झालीय. सर्वपक्षीय पॅनलसाठी महायुतीच्या नेत्यांसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती खुद्द कुलभूषण पाटील यांनी दिलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.