Maharashtra Politics: विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान राष्ट्रवादीच्या आमदाराचा मोठा निर्णय; निवृत्तीची केली घोषणा

NCP MLA Retirement From Active Politics: राज्यात राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू असताना अजित पवार गटात मोठी घडामोड घडलीय. अजित पवार गटातील आमदारानं थेट सक्रीय राजकारणात निवृत्ती घेतलीय. विलीनीकरणावरून आमदार नाराज असल्याची चर्चा असताना आमदारानं निवृत्ती घेतल्यानं खळबळ उडालीय.
NCP MLA Prakash Solanke announces retirement from politics
NCP MLA Prakash Solanke announces retirement from politicssaam tv
Published On: 
Summary
  • आमदार प्रकाश सोळंके यांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा.

  • माजलगाव येथील विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात केली घोषणा.

  • आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचं प्रकाश सोळंके यांनी स्पष्ट केलं.

गेल्या काही दिवसापासून दोन्ही राष्ट्रवादी म्हणजेच शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येणार असल्याची चर्चांनी जोर धरला होता. मात्र सुप्रिया सुळे या सर्वा चर्चा फेटाळून लावल्या आहेत. दुसरीकडे विलीनीकरणावरून दोन्ही गटातील आमदार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्याचदरम्यान आता राष्ट्रवादीच्या आमदाराने मोठा निर्णय घेत थेट राजकारणातून निवृत्ती घेतलीय.इतकेच नाही तर आपलला वारसदार कोण असेल याचीही घोषणा त्यांनी केलीय. राष्ट्रवादीच्या आमदाराच्या या घोषणेमुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडालीय.

राजकारणातून निवृत्ती घेणारे हे आमदार आहेत, प्रकाश सोळंके. ोळंके यांनी आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा करत आपला राजकीय वारसदार जाहीर केलाय. माजलगाव येथे आयोजित विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली.

आगामी विधानसभा निवडणुकीत आपण उमेदवार नसणार असून, आपला पुतण्या जयसिंह सोळंके हा पुढचा उमेदवार असेन. ज्या पद्धतीने आजपर्यंत मला प्रेम आणि साथ दिली, त्याच पद्धतीने यापुढेही सोळंके कुटुंबावर प्रेम कायम ठेवा, असं आवाहनही त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केलं.

NCP MLA Prakash Solanke announces retirement from politics
Natasha Awhad:डिलिमिटेशन'वरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वादाची ठिणगी; आव्हाडांच्या पोस्टनं खळबळ

विशेष म्हणजे, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रकाश सोळंके यांनी निवडणूक न लढवण्याची आणि राजकीय वारसदार पुढे आणण्याची घोषणा केली होती. मात्र, आता पुन्हा एकदा राजकीय निवृत्तीचा पुनरुच्चार करत त्यांनी जयसिंह सोळंके यांचं नाव पुढे केल्याने माजलगावच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय.

NCP MLA Prakash Solanke announces retirement from politics
रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाची चर्चा सुरूय. अजित पवार आणि शरद पवार यांच्या गटातील नेत्यांकडून याबाबत वेगवेगळी विधाने केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील माजलगावमधून आलेल्या या घोषणेने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधलंय.

आमदार प्रकाश सोळंकेंची मोठी घोषणा

मी आता उमेदवार म्हणून तुमच्यासमोर येणार नाही. जयसिंहभैय्याला मी आता उमेदवारी देईन. जसे उमेदवार नेता म्हणून तुम्ही मला प्रेम दिले, तसे प्रेम जयसिंहभैय्याला देखील द्या. माझ्या वडिलांना म्हणजे सुंदरराव सोळंके यांना माजलगावकरांनी आमदार म्हणून कमी कालावधी दिला. पण आम्हाला माजलगावकरांनी सेवा करण्याची संधी दिली. जयसिंहभैय्याला देखील सेवेची संधी द्या.

मंत्रीपद न मिळाल्याने होते नाराज

प्रकाश सोळंके यांनी याआधी मंत्रीपद न मिळाल्याबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळात निर्माण झालेल्या संधीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश सोळंकेंनी आपली मंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली होती.

मंत्रिपदाच्या संधीबाबत बोलताना त्यांनी आपल्याला जातीय समीकरणांमुळे संधी मिळत नसल्याची खंत व्यक्त केली होती. आपण ओबीसी समाजात जन्माला आलो असतो, तर कदाचित मंत्रीपदाची संधी मिळाली असती, असे विधान त्यांनी केले होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.