

विधानसभा निवडणुकीसाठी सपा काँग्रेसचा जागावाटपाचा फॉर्म्युला
सपा काँग्रेसच्या जागावाटपाची अंतिम यादी कधी जाहीर होणार
भाजपविरोधात सपा काँग्रेसचा नवा राजकीय मास्टरप्लॅन
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड घडलीय. प्रदीर्घ ओढाताणीनंतर काँग्रेस आणि समाजवादी पक्षातील जागावाटपाटचा तिढा मिटलाय. सोमवारी दिल्लीत झालेल्या पहिल्या बैठकीत जागावाटपाचे फॉर्म्युला निश्चित करण्यात आला. हा फॉर्म्युला तीन श्रेणींमध्ये विभाजन करण्यात आले आहे. काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांच्यातील समन्वय समितीची पहिली बैठक दिल्लीत पार पडली. ही बैठक काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी यांच्या निवासस्थानी पार पडली. (Sp-congress Seat-sharing Formula Finalised | Up Election Political Update)
समाजवादी पक्षाच्या वतीने या बैठकीला राज्यसभेचे खासदार राम गोपाल यादव, उत्तर प्रदेश राज्य अध्यक्ष श्यामलाल पाल, घोसीचे खासदार राजीव राय आणि कैरानाचे खासदार इकरा हसन उपस्थित होते. या बैठकीत काँग्रेसतर्फे प्रमोद तिवारी, उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रभारी राजेंद्र पाल गौतम, उत्तर प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा आराधना मिश्रा 'मोना', उत्तर प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष इम्रान मसूद आणि उत्तर प्रदेश काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते वीरेंद्र चौधरी उपस्थित होते.
समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या समन्वय समित्यांमध्ये सुमारे तासभर चाललेल्या बैठकीनंतर दोन्ही पक्षांनी माध्यमांशी बोलताना जागावाटपाचा सुत्र तीन दिवसानंतर जाहीर केलं जाईल असं सांगितलं. या दोन्ही पक्षांची आणखी एक बैठक उद्या होणार आहे. तसेच, लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी जसे त्यांनी एकत्र येऊन काम केले होते, त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही विजय मिळवण्यासाठी ते मिळून काम करतील, असेही दोन्ही बाजूंनी स्पष्ट करण्यात आलंय.
सूत्रांनुसार, दोन्ही पक्षांनी जागांचे 'अ', 'ब' आणि 'क' अशा तीन गटांत वर्गीकरण करून चर्चेला सुरुवात केलीय. 'अ' गटात सहज जिंकता येण्याजोग्या जागांचा समावेश असून, काँग्रेसने यापैकी ५५ जागांवर आपला दावा सांगितलाय. 'ब' आणि 'क' गटांतील जागांबाबत उद्या चर्चा होणार आहे. त्यानंतर उमेदवारांच्या यादीचा अंतिम मसुदा तयार केला जाईल, असं सांगितलं जातंय.
बैठकीदरम्यान समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेससमोर एक महत्त्वाचा प्रस्ताव मांडला. बैठकीत समाजवादी पक्षाने 'निवडून येण्याची क्षमता' या निकषावर आधारित धोरणावर भर दिला. त्यानुसार नेत्यांनी काँग्रेसकडे जागांच्या यादीसोबतच त्या विजयी होतील अशा नेत्यांची नावे देखील मागितली आहेत. जेणेकरून जमिनीवरील राजकीय परिस्थितीचे अचूक मूल्यमापन करता येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.