SBI मशीनमध्येच बनावट नोटांचा भरणा! ५०० रुपयांच्या ४७ नोटा पाहून बँकेलाही धक्का

Nashik Niphad SBI Bank Fake Currency Notes Case: नाशिकच्या निफाडमध्ये एसबीआयच्या सीडीएम मशीनमध्ये ५०० रुपयांच्या ४७ बनावट नोटा जमा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Nashik Niphad SBI bank fake currency
Nashik Niphad SBI bank fake currencysaam tv
Published On: 

अजय सोनवणे, साम टीव्ही

नाशिक: जिल्ह्यातील निफाडमध्ये स्टेट बँकेच्या सीडीएम मशीनमध्ये बनावट नोटा जमा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 500 रुपयांच्या तब्बल ४७ बनावट नोटा, म्हणजेच २३ हजार ५०० रुपयांच्या बनावट चलनी नोटा मशीनमध्ये जमा करण्यात आल्या. बँकेच्या नोट सॉर्टिंग मशीनमध्ये तपासणी केली असता या सर्व नोटा बनावट असल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे बँकेच्या व्यवहारांची तपासणी करताना या नोटा जमा करण्यासाठी वापरण्यात आलेल्या ATM कार्डशी संबंधित खाते संदीप रंगनाथ निकम यांच्या नावावर असल्याचे समोर आले आहे. हे खाते नाशिक रोड येथील जेलरोड शाखेतील संरक्षण निवृत्तीवेतनधारक खाते असल्याची माहिती आहे. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजून ४१ ते ९ वाजून ४५ मिनिटांच्या दरम्यान या नोटा CDM मशीनमध्ये जमा झाल्याचे व्यवहारातून स्पष्ट झाले आहे.

Nashik Niphad SBI bank fake currency
संध्याकाळची सफर ठरली अखेरची! ट्रकला दुचाकी मागून धडकली; 3 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

या प्रकरणी SBI चे उपव्यवस्थापक हेमंत अशोकराव पाटील यांनी निफाड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बँकेतील उपशाखा प्रबंधक सीमा रामदास जगताप, सहाय्यक सागर सोमनाथ घुमरे आणि सेवा व्यवस्थापक शीतल पाटील यांनीही या प्रकरणातील तपास प्रक्रियेत महत्त्वाची माहिती उपलब्ध करून दिली आहे.

Nashik Niphad SBI bank fake currency
Crime News : यूट्यूबवर व्हिडिओ पाहिला अन् थेट 3 घरं फोडली! चोराची आयडिया ऐकून पोलीसही चक्रावले

अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम १७९, १८० आणि ३१८(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट नोटा चलनात आणण्यामागे आणखी काही व्यक्ती किंवा मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचाही सखोल तपास होण्याची गरज व्यक्त होत आहे. निफाड पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनल चंद्रभान फडोळ आणि पोलीस शिपाई धनंजय बैरागी पुढील तपास करत आहेत. बँकेच्या मशीनमध्ये थेट बनावट नोटा जमा होतातच कशा? या प्रकारामागील संपूर्ण साखळी पोलिस तपासातून उघड होणार का, याकडे आता निफाडकरांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.