संध्याकाळची सफर ठरली अखेरची! ट्रकला दुचाकी मागून धडकली; 3 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

Palghar Road Accident : पालघरमधील बोईसर-नवापूर मार्गावर एक भीषण अपघात घडला. पाम टेंभी गावाजवळ भरधाव वेगाने जाणारी मोटारसायकल एका ट्रकवर आदळल्याने, तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला.
Boisar Accident: Three College Students Killed In Bike-truck Collision In Palghar
Boisar Accident: Three College Students Killed In Bike-truck Collision In Palghar
Published On: 
Summary
  • बोईसर नवापूर रोडवर तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा अपघात

  • पाम टेंभी गावाजवळ दुचाकी ट्रकला धडकून तिघांचा मृत्यू

  • पालघर जिल्ह्यातील बोईसरमध्ये भीषण अपघाताची घटना

रुपेश पाटील, साम प्रतिनिधी

पालघर जिल्ह्यातील बोईसर परिसरात भीषण अपघाताची घटना घडली आहे. बोईसर-नवापूर रोडवरील पाम टेंभी गावाच्या हद्दीत भरधाव दुचाकीने ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Boisar Accident: Three College Students Killed In Bike-truck Collision In Palghar
Accident: सकाळी-सकाळी भयंकर अपघात, ट्रक आणि स्कॉर्पिओच्या धडकेत ५ जणांचा जागीच मृत्यू; ४ जणांची प्रकृती चिंताजनक

मोहित शर्मा, रवी गुप्ता आणि नयन महातो अशी अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे तिन्ही विद्यार्थी बोईसरमधील गणेश नगर परिसरात राहत असल्याची माहिती आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तिन्ही विद्यार्थी संध्याकाळच्या सुमारास दुचाकीवरून नांदगाव-आलेवाडी बीचच्या दिशेने जात होते. याचदरम्यान बोईसर-नवापूर रोडवरील पाम टेंभी गावाच्या हद्दीत त्यांच्या भरधाव दुचाकी पुढे धावणाऱ्या ट्रकला मागे धडकली.

Boisar Accident: Three College Students Killed In Bike-truck Collision In Palghar
भयंकर अपघात! जुना मुंबई-पुणे महामार्गावर खासगी बसनं अनेक वाहनांना उडवलं, VIDEO

धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील तिन्ही विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली. तीन तरुण विद्यार्थ्यांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने गणेशनगर परिसरात शोककळा पसरली आहे.एकाच दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या तीन तरुणांचा अपघातात मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

ऐन उमेदीच्या वयात तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.दरम्यान, या अपघाताची नोंद सातपाटी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अपघात नेमका कशामुळे घडला, याबाबत पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.