ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बऱ्याच लोकांना जेवणानंतर बडीशेप खाण्याची सवय असते.
बडीशेप शरीरासाठी थंड असल्यामुळे जेवणानंतर ती खाल्ली जाते.
मात्र, काही लोकांसाठी बडीशेप खाणं शरीरासाठी घातक ठरू शकते
जास्त प्रमाणात बडीशेपचं सेवन केल्यास तुम्हाला एलर्जी होऊ शकते.
तु्म्ही जर जास्त प्रमाणात बडीशेपचं सेवन करत असाल तर तुम्हाला त्वचे संबंधीत समस्या होण्याची शक्यता असते.
तुम्ही जर कोणत्याही प्रकारचे औषध घेत असाल तर बडीशेप खाणं टाळा.
जास्त प्रमाणात बडीशेप खाल्यामुळे तुमच्या शरीरातील हार्मोन्स असंतुलित होऊ शकतात यामुळे योग्य प्रमाणात बडीशेप खा.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक माहितीसाठी योग्य वैद्यकीय सल्ला घ्या