Eye Care  Saam TV
लाईफस्टाईल

Eye Care : दिवसभर मोबाईल आणि लॅपटॉपवर काम करून डोळे दुखतायत? मग 'या' एक्सरसाइज आजपासूनच सुरू करा

Ruchika Jadhav

सध्या शिक्षण घेत असलेल्या मुलांपासून ते अगदी ऑफिस आणि वयोवृद्ध व्यक्ती देखील फोन आणि लॅपटॉचा जास्तीत जास्त वापर करतात. सतत स्क्रिन पाहिल्याने याचा पूर्ण परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. डोळ्यांवर लाइट्सचा ताण आल्याने डोळे दुखण्यास सुरुवात होते. लॅपटॉप आणि फोनवर असलेल्या लाईट्सने काही व्यक्तींना चष्मा देखील लागला आहे.

काही व्यक्तींना चष्मा लागल्यावर डोळे कोरडे पडणे किंवा डोळ्यांतून पाणी येणे, सतत डोळे चुरचुरणे असे त्रास होतात. ही सर्व डिजिटल आय स्ट्रेनची लक्षणे आहेत. आता तुम्हाला सुद्धा असे होत असेल तर आम्ही आज तुमच्यासाठी काही खास रामबाण उपाय शोधून आणलेत. यात काही आसनांची माहिती देण्यात आली आहे.

२०-२०-२० रुल

डोळ्यांवर जास्त ताण फोन आणि स्क्रिन पाहिल्यानेच वाढतो. आपण काम करताना स्क्रिनवर पूर्ण लक्ष केंद्रित असते. त्यामुळे अंधुक दिसणे, डोळे आणि डोकं जड होणे अशा अडचणी जाणवतात. त्यामुळे तुम्ही २०-२०-२० रुल फॉलो करू शकता. त्यासाठी काम करताना दिवसातून तीन वेला २० सेकंदांचा ब्रेक घ्या. यामध्ये तुम्ही २० सेकंद नजर स्क्रिनवरून बाजूला करून दुसरीकडे फिरवा.

पापण्यांची उघडझाप करा

काम करताना आपण मन आणि चित्त एकाग्र करतो. त्यामुळे आपण साधं पापण्यांची उघडझाप करणं सुद्धा विसरून जातो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने डोळ्यांचा त्रास सुरू होताच स्क्रिनकडे पाहताना सतत पापण्यांची उघडझाप केली पाहिजे. पापण्यांची सतत उघडझाप केल्याने डोळ्यांना रिलॅक्स फिल होते.

ब्राइटनेस बदला

स्क्रिनवर काम करताना त्याची ब्राइटनेस आपल्या डोळ्यांना सहन होईल अशीच असावी. फोन आणि लॅपटॉपच्या सेटिंग्समध्ये तुम्हाला ब्राइटनेस अॅडजेस्ट करण्याचा पर्याय मिळतो. त्यामुळे डोळ्यांना जसं सुट होईल तसं तुम्ही ब्राइटनेस कमी जास्त केले पाहिजे. ब्राइटनेस कंट्रोलमध्ये असल्यास आपल्या डोळ्यांना आराम मिळतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Elections Date Live Update : महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान तर २३ तारखेला मतमोजणी: मुख्य निवडणूक आयुक्त

Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले! २० नोव्हेंबरला मतदान, २३ तारखेला निकाल, EC कडून घोषणा

Shraddha Kapoor: श्रद्धा कपूर कोणाच्या पडली प्रेमात? 'त्या' चर्चांना वेध

Solapur News : बार्शी पंचायत समितीच्या माजी सभापतीवर अँटीकरप्शनची कारवाई; पत्नी, मुलाच्या नावाने बेहिशोबी मालमत्ता

IND vs NZ Weather Update: भारत- न्यूझीलंड सामना रद्द होणार? वाचा बंगळुरुतील हवामानाच अंदाज

SCROLL FOR NEXT