Remedies for Joint Pain: पावसात सांधेदुखीच्या वेदना असह्य होतात? करा आयुर्वेदिक उपचार, मिळेल दीर्घकाळ आराम

Ayurvedic Remedies for Joint Pain: पावसाळ्यात बदलत्या हवामानामुळे सांधेदुखीची समस्या उद्भवते. पावसात सांधेदुखीच्या वेदनांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी 'हे' आयुर्वेदिक उपचार करा.
Joint Pain Ayurvedic Remedies
Monsoon Joint PainSAAM TV
Published On

सध्या पावसाच्या वातावरणामुळे सर्वत्र हिरवळी सोबत अनेक आजारांना आमंत्रण मिळते. पावसातील संसर्गजन्य वातावरणामुळे सांधेदखी, अंगदुखीचा त्रास सुरू होतो. पावसात हवेमध्ये गारवा आढळतो. ज्यामुळे सांधे आणि स्नायूंच्या वेदना वाढतात. तसेच हवामानातील आर्द्रतेसोबत, पोषक आहाराचा अभाव, शारीरिक हालचालींचा अभाव इत्यादी गोष्टी देखील सांधेदुखीला कारणीभूत ठरतात.

पावसात सांधेदुखीची कारणे

हवामानातील बदल

पावसाळ्यात अनेक लोकांना वाताचा आणि पित्ताचा त्रास होतो. शरीरातील वात किंवा हवेच्या असमतोलामुळे सांधेदुखी वाढते. पावसातील हवामान बदलामुळे वातावरणात ओलावा येतो. त्यामुळे सांध्यामध्ये जडपणा येतो. स्नायूंना सूज येऊ लागते. तीव्र वेदना आणि अस्वस्थता जाणवते. पावसात अधिक लोक पिष्टमय पदार्थांचा आहारात समावेश करतात. या पदार्थांमध्ये हाय कार्बोहायड्रेट्स असतात. ज्यामुळे शरीराला जळजळ होते आणि सांधेदुखी वाढते.

व्यायामाचा अभाव

पावसातील थंड वातावरणामुळे आपण व्यायाम करायला आळस करतो. त्यामुळे शरीराची हालचाल होत नाही. परिणामी हाडे आखडू लागतात. त्यामुळे पावसात घरीच थोडा व्यायम करणे गरजेचे आहे. सांध्याचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी रोज ४० ते ५० मिनिटे तरी शरीराची हालचाल करावी. तसेच पावसात येणाऱ्या ताप, सर्दी आणि खोकल्यामुळे सांधेदुखीची समस्या निमार्ण होते.

बसण्याची चुकीची पद्धत

पावसातील आर्द्रतमुळे शरीरातील गती कमी होते. आळसामुळे आपण कसे पण बसून लागतो. यामुळे शरीर आखडते. अशावेळी आखडून किंवा चुकीची पद्धतीत बसल्यास सांध्येदुखीचा त्रास उद्भवतो. नेहमी ताठ बसावे ज्यामुळे स्नायूंना आधार मिळतो.

Joint Pain Ayurvedic Remedies
Hair Care Tips : चहा पिण्याऐवजी केसांना लावा आणि जादू पाहा; पांढरे केस होतील मिनिटांत गायब

सांधेदुखीवर आयुर्वेदिक उपचार

तेल मालिश

पावसात सांधेदुखीचा त्रास होत असल्यास एरंड्याच्या तेलाने आणि मोहरीचे तेलाने सांध्यांना मालिश करावे. कोमट तेलाने मालिश केल्यास वेदना कमी होतात. स्नायू मोकळे होतात. हाडांची सूज देखील उतरते.

मीठाच्या पाण्याने आंघोळ

पावसात आंघोळ करताना पाण्यात थोडे मीठ घाला. यामुळे सांधेदुखीवर आराम मिळतो. तसचे गरम पाण्यात मीठ घातल्यामुळे शरीराला देखील शेक मिळतो.

सुंठ काढा

पावसात चांगल्या आरोग्यासाठी काढा पिणे आवश्यक आहे. तसचे पावसातील दमट हवामानामुळे अंगदुखीचा त्रास वाढतो. यावर रामबाण उपाय म्हणजे सुंठ घालून काढा प्यावा. हा आयुर्वेदिक काढा बनवण्यासाठी एक कप पाण्यामध्ये सुंठ पावडर आणि आले टाका. हे मिश्रण छान उकळून घ्या. त्यानंतर यामध्ये चवीसाठी थोडा गूळ घाला आणि एक उकळी येऊ द्या. अशाप्रकारे सुंठ काढा तयार झाला.

मेथी दाणे

आयुर्वेदात मेथी दाण्यांना औषधी मानले आहे. त्यामुळे तुम्ही रात्र झोपताना मेथी दाणे पाण्यात भिजत घालून ठेवा आणि सकाळी उठल्यावर याची मिक्सरला पेस्ट करून घ्या. ही पेस्ट दुखत असलेल्या भागावर लावा. शरीराची सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होईल.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Joint Pain Ayurvedic Remedies
Ranbhajya: मोहरी,भुई आवळी,पाथरी,आंबोशी रानभाज्या आहेत औषधी गुणधर्मांनी समृध्द; पावसाळ्यात नक्की खा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com