Monsoon Travel Tips : पावसात बीचवर फिरण्याचा प्लान करताय? 'या' गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर जीव गमवाल

Beach Travel Tips In Monsoon : सध्या महाराष्ट्रभर पावसाने धुमाकूळ घातला आहे. नद्या, नाले, तलाव, समुद्र ओसंडून वाहत आहे. अशात जर तुम्ही समुद्रकिनारी फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा.
Beach Travel Tips In Monsoon
Monsoon Travel TipsSAAM TV
Published On

गेले दोन-तीन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. वातावरणात गारवा पसरला आहे. सर्वत्र ओलचिंब रस्ते आणि हिरवळ पाहायला मिळत आहे. पावसात फिरायला अनेकांना आवडते. प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार गडकिल्ले, लेणी, धबधबा, समुद्रकिनारी भेट देतात. आजकाल पावसाने खूप जोर धरला आहे. अशात जर तुम्ही समुद्रकिनारी फिरायला जाण्याचा प्लान करत असाल तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा आणि आपले जीवन वाचवा.

पावसाळ्यात समुद्रकिनाऱ्यावर जाताना कोणती काळजी घ्यावी?

पावसात समुद्रकिनारी भेट

सर्वप्रथम जास्त पाऊस असल्यास समुद्रकिनारी भेट देण्याचे टाळा. थोडा पाऊस सरल्यास समुद्रकिनारी फिरायला जा. खूप मुसळधार पाऊस पडत असेल, विजा चमकत असतांना समुद्रकिनारी जाणे टाळा.

जीवरक्षकांच्या सूचनांचे पालन

समुद्रावर फिरायला गेल्यावर जास्त पाण्याजवळ जाऊ नये. जीवरक्षकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. पावसात समुद्रकिनारी जायचे असल्यास एखादा गर्दीचा किनारा निवडावा. शांत समुद्रकिनारी पावसात जाऊ नये. जीवाचा धोका वाढू शकतो. तसचे जीवरक्षक नसलेल्या समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळावे.

जलक्रीडा टाळा

आजकाल बरेच लोक ट्रेंडच्या किंवा आपली आवड म्हणून समुद्रकिनारी जलक्रीडा करतात. अचानक मोठी लाट आल्यास तुमच्या जीवावर बेतू शकते.

लहान मुलांची काळजी

लहान मुलांना पावसात समुद्रकिनारी घेऊन जात असाल तर त्यांची विशेष काळजी घ्या. समुद्रकिनारी मुलांवर बारकाईने लक्ष ठेवा. मुल तुमचा डोळा चुकवून समुद्रात जाऊ शकतात.पावसात समुद्रकिनारी कोणतेही खेळ खेळणे टाळावे. कारण अचानक येणाऱ्या लाटेमुळे जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

Beach Travel Tips In Monsoon
Indian Railway: विविधतेने नटलेला प्रवास अन् उत्तम सुविधा; कशी आहे देशातील सर्वात लांब ट्रेन? वाचा सविस्तर

ओहोटी

समुद्रात ओहोटी असल्यास दगडांवर बसू नये. कारण पावसात खडकाळ भाग, उंचवटे आणि दगडांवरून घसरण्याची भीती जास्त असते. पावसात समुद्रकिनारी गेल्यावर गुडघ्याच्या वर असलेल्या पाण्यामध्ये जाणे टाळावे.

दुपारी समुद्रकिनारी जाणे टाळा

पावसात दुपारी समुद्रकिनारी जाऊ नये. दुपारी वाऱ्याची गती अधिक असल्यामुळे समुद्र खवळलेला असतो. ज्यामुळे जीवाचा धोका वाढतो.

स्वतःची सुरक्षितता

पावसात समुद्रकिनारी जाताना संरक्षण देणारे कपडे आणि कंफर्टेबल बूट घालावी. पावसात कधीही एकट्याने समुद्रकिनारी जाऊ नये. तुमचा छोटा निष्काळजीपणा जीवाचा धोका निर्माण करले.

आपत्कालीन परिस्थितीचा सामना

नेहमी समुद्रकिनारी प्रवेश करण्याआधी प्रवेशद्वारांवर संरक्षणासाठी असलेली चिन्हे वाचूनच आत जावे. आपत्कालीन परिस्थितीत याचा उपयोग होतो. तसेच जवळचे पोलिस स्टेशन, रुग्णालयांचे संपर्क क्रमांक जवळ ठेवावेत.

टीप : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Beach Travel Tips In Monsoon
Kokankada Viral Video : कोकणकडा धबधब्याचं अद्भुत सौंदर्य; व्हिडिओ पाहून मन भारावून जाईल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com