Kokankada Viral Video : कोकणकडा धबधब्याचं अद्भुत सौंदर्य; व्हिडिओ पाहून मन भारावून जाईल

Kokankada Viral Video : कोकणकडा धबधब्याला भेट देण्यासाठी तुम्हाला नाशिकच्या हरिश्चंद्र किल्ल्याला भेट द्यावी लागेल. हरिश्चंद्र किल्ल्यावर हा कडा आहे.
Kokankada Viral Video
Kokankada Viral VideoSaam TV
Published On

पावसाळा सुरू होताच सर्वांना बाहेर हील स्टेशन, धबधबे अशा ठिकाणी फिरायला जाण्याची ओढ लागते. आता जुलै महिना सुरू झाला आहे. अशात अनेकांनी बाहेर फिरण्याचा प्लान केला असेल. सोशल मीडियावर देखील विविध धबधब्याचे अनेक व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहेत. त्यातच कोकणकडा धबधब्याचा देखील एक सुंदर व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Kokankada Viral Video
Nashik Sting Operation : पिकविम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट; साम टीव्हीने 'स्टिंग' ऑपरेशन करून केला पर्दाफाश

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कोकणकडा धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी उफाळून आली आहे. सर्वजण तेथील उलट्या वाहणाऱ्या धबधब्याचा आनंद घेत आहेत. उंच डोंगरावर व्यक्ती उभ्या आहेत. तेथे धबधब्याचे पाणी खाली जण्याऐवजी वरती येत आहे. म्हणजे धबधब्यात भिजण्यासाठी तुम्हाला खाली उतरण्याची गरज नाही.

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत असलेलं हे दृश्य खरोखर डोळ्याचं पारणं फेडणारं आहे. @manishapatil2010 या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील या ठिकाणी फिरायला जाण्याचा मोह आवरणार नाही. कड्यावरून पर्यटकांनी खाली पडूनये यासाठी प्रशासनाने यावर रेलिंग लावलं आहे.

मात्र पर्यटक नेहमीच अशा जीवघेण्या ठिकाणी सुद्धा नियम मोडतात. कोकणकडा धबधब्यावर देखील या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, काही पर्यटक रेलिंग पार करून थेट बाहेर आलेत. बाहेर येऊन त्यांचं फोटोशूट सुरू आहे. त्यामुळे व्हिडिओवर नेटकऱ्यांनी या पर्यटकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. सरकार वेडं उगाच रेलिंग लावले, यांना रेलिंग बाहेर जाऊन रील काढून कूल वाटतंय, पण यांना नंतर समजेल, घरी कोणितरी आपली वाट बघती ह्यचा विचार करायला हवा, अशा काही कमेंट या व्हिडिओवर आल्या आहेत.

जर सुख कळण्याच्या नादात जर पडले तर दुःख पण कळत नाही, अश्या मूर्ख लोकांमुळे काहीतरी घटना घडते अणि नियम सुरक्षितता बाळगून फिरणार्‍या लोकांना सुद्धा बंदी घातली जाते, अशा शब्दांत काहींनी या पर्यटकांवर संताप सुद्धा व्यक्त केला आहे.

कोकणकड्याला कसं जायचं?

कोकणकडा धबधब्याला भेट देण्यासाठी तुम्हाला नाशिकच्या हरिश्चंद्र किल्ल्याला भेट द्यावी लागेल. हरिश्चंद्र किल्ल्यावर हा कडा आहे. येथे वाऱ्याचा वेग इतका जास्त असतो की, त्यामुळे पाणी खाली पडण्याऐवजी थेट वरच्या दिशेने फेकलं जातं.

Kokankada Viral Video
Nashik Onion Scam News : नाशिकमध्ये कांदा घोटाळा दडपण्याचा प्रयत्न?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com