Ranbhajya: मोहरी,भुई आवळी,पाथरी,आंबोशी रानभाज्या आहेत औषधी गुणधर्मांनी समृध्द; पावसाळ्यात नक्की खा

Wild Vegetable Benefits: कोवळ्या मेथीच्या पाल्याची भाजी कफावर उपयुक्त आहे. अनियमित मासिक पाळीमुळे येणारा थकवा या भाजीच्या सेवनाने दूर होतो.
 Monsoon Health
RanbhajyaSaam Tv

जून सरला आणि नियमित पाउस भिरभिरू लागला की बाजारात रान भाज्या (Wild Vegetable) दिसू लागतात. रानभाजा म्हणजे हिरव्या फळभाजा आणि पालेभाज्या. बारमाही पालेभाज्या आपण पावसाळ्यात खात नाही. या काळात या भाज्यांत अळ्या होतात. तसंच, काही रानभाज्या परंतु पावसाळ्याव्यतिरिक्त त्यांच्यांत विषारी गुणधर्म आढळतात. म्हणुनच जाणत्यांच्या सल्ल्याशिवाय बारमाही रानभाजी पावसाळ्यात खाउ नये. अन्नातून केवळ उर्जा मिळत नाही तर, त्यातल्या विविध घटकांचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. यातल्या कोणत्या भाज्यांमधे कोणते औषधी गुणधर्म आहेत, ते आज मी तुम्हाला सांगणार आहे.

 Monsoon Health
Banana Leaf Benefits : केळीच्या पानांवर जेवून तर पाहा; त्वचा होईल तजेलदार आणि मुलायम

१. मोहरीची भाजी - आपल्या स्वयंपाघरात मोहोरीचा दररोज वापर होतो. परंतु याची पाने वनौषधी आहेत, हे तुम्हाला माहीती होतं का? कोवळ्या मेथीच्या पाल्याची भाजी कफावर उपयुक्त आहे. अनियमित मासिक पाळीमुळे येणारा थकवा या भाजीच्या सेवनाने दूर होतो.

२. भुई आवळी - ही बहुगुणी भाजी आहे. याचे फळ, पान. खोड आणि मुळसुद्धा उपयुक्त आहे. सर्दी, खोकला, ताप, कावीळ, कुष्ठ, गजकर्ण, सायनस, चीबी, अपचन, वंध्यत्व आणि मधूमेहावर उपयुक्त आहे.

३. पाथरीची भाजी - पाथरीची पाने पित्तशामक असतात. या पानांचा रस बलवर्धक आणि रक्तकारक आसतो. लोखंडाच्या भांड्यात याची भाजी केल्यास प्रकृती काटक आणि सशक्त होते. ही पाथरी फळाला आल्यास मात्र खाउ नये.

४. आंबोशी - ही भाजी बारमाही आहे मात्र ती पावसाळ्यातच खावी. या भाजीची कच्ची पाने खाल्ल्यास नुळव्याध बरा होतो. त्याव्यतिरिक्त वात, कफ यांच्यासाठीही ती गुणकारी आहे.

५. चिचारटी - या फळांमधे औषधी गुणधर्म आहेतच हण ती चवीलाही छान लागते. ही फळे उकडून, सुकवून मिरची घालून त्याचा ठेचा करावा आणि त्याला कच्च्या तेलाची फोडणी द्यावी. रक्तशुद्धी, रक्तवृद्धी आणि रक्त पातळ करणारी ही वनस्पती आहे. अपचन, आम्लता आणि हृदयविकाराचा धोका या भाजीने कमी होतो.

अशा अनेक रानभाज्या आहेत. त्यांचे अनेक गुणधर्म आहेत. पावसाळ्यात रानभाज्या खा आणि तंदुरूस्त रहा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com