Rajeev Deshmukh : ऐन दिवाळीत राजकीय वर्तुळात शोककळा; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिलेदाराचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Rajeev Deshmukh death : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजीव देशमुख यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने ऐन दिवाळीत राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
Rajeev Deshmukh death  news
Rajeev Deshmukh death Saam tv
Published On
Summary

माजी आमदार राजीव देशमुख यांचं निधन झालं

त्यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं

राजीव देशमुख यांच्या निधनाने चाळीसगावातील राजकारणात पोकळी निर्माण

Rajiv Deshmukh Passes Away : जळगावमधील चाळीसगाव विधानसभेचे माजी आमदार राजीव देशमुख यांचं आज मंगळवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. राजीव देशमुख यांच्या निधनाने जळगावातील राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

राजीव देशमुख यांनी २००९ ते २०१४ या कालावधीत त्यांनी चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचं आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलं होतं. त्यांनी चाळीसगा नगरपरिषदेचं नगराध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. सध्या ते शरद पवार गटात उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते.

Rajeev Deshmukh death  news
नवी मुंबईत पालिका निवडणुकीआधी शरद पवार गटात नाराजी उफाळली; आधी बंडखोरी, आता आमलेंना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

देशमुख यांचा २०१४ आणि २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी त्यांनी जोरदार तयारी सुरु केली होती. लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीकडून त्यांच्या नावाची चर्चा सुरु होती. त्यांना जनसंपर्क आणि प्रशासनाचा दांडगा अनुभव होता.

राजीव देशमुख यांच्या निधनाने चाळीसगावसह उत्तर महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर विविध पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली व्यक्त केली. त्यांच्या निधनाने त्यांचं स्थान भरून न निघणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

Rajeev Deshmukh death  news
Pune News : ऐन दिवाळीत पुणे महापालिकेत खळबळ; दोन बडे सरकारी अधिकारी निलंबित, काय आहे प्रकरण?

खासदार शरद पवार यांनी पोस्ट करत म्हटलं की, माझे सहकारी आणि चाळीसगाव विधानसभेचे माजी आमदार राजीव देशमुख यांच्या निधनाचे वृत्त अकस्मित आहे. नगराध्यक्षापासून ते आमदारापर्यंतच्या त्यांच्या कारकिर्दीत सामान्य जनतेशी जोडलेली नाळ हिच त्यांची खरी ताकद ठरली. संघटना वाढीसाठीही त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं.

Rajeev Deshmukh death  news
India vs South africa : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; ऋषभ पंतकडे कर्णधारपदाची जबाबदारी

'स्थानिकसह राज्य पातळीवर जनमनांमध्ये त्यांनी निर्माण केलेली प्रतिमा अभिमानास्पद आहे. पक्षाने त्यांच्या रूपाने एक लोकाभिमुख आणि निष्ठावंत कार्यकर्ता गमावला आहे. देशमुख कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत, असं म्हणत शरद पवारांनी श्रद्धांजली व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com