Maharashtra Live News Update : उल्हासनगरमध्ये ऑफिस खुर्ची बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री भीषण आग

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज मंगळवार, दिनांक २१ ऑक्टोबर २०२५, महाराष्ट्रात दिपोउत्सोव, आज लक्ष्मीपूजन; राज्यातील राजकीय घडामोडी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

EV बाईक च्या शोरूम ला भीषण आग जवळपास 50 ते 60 दुचाकी वाहन जळून खाक

पिंपरी चिंचवड शहरातील वाकड येथील EV बाईकच्या एका शोरूम ला आज पहाटे भीषण आग लागली आहे. या आगीत जवळपास 50 ते 60 दुचाकी वाहन पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. सकाळी पाच वाजता दरम्यान EV बाईकच्या शोरूम ला आग लागल्याची वर्दी अग्निशमन दलाला मिळाली त्यानंतर अग्निशमन दल लगेच घटनांसाठी दाखल होऊन आग आटोक्यात आणली आहे. शॉर्टसर्किटमुळे शोरूम ला आग लागली असावी असा अग्निशमन दलाचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.

रत्नागिरीत मध्यरात्री पावसाची हजेरी

पावसाने मध्यरात्री रत्नागिरी जिल्ह्यात हजेरी लावली.. गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे बळीराजा शेतीच्या कामात व्यस्त झाला होता. मात्र कालपासून ढगाळ वातावरण होतं. उष्णतेतही वाढ झाली होती. त्यामुळे पावसाची शक्यता होती. अखेर रात्री पावसाने हजेरी लावली. रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर, चिपळूण आदी तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

मावळमध्ये राजकीय बदलाचे संकेत. तळेगाव येथील कार्यक्रमातून नवीन राजकीय समीकरणाची चाहूल

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण आयोजित केलेल्या कार्यक्रमात मावळ तालुक्याच्या राजकारणात नव्या समीकरणाची चाहूल लागली आहे. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या आमदार सुनील शेळके यांनी युतीसाठी एक हात पुढे करण्याचा संदेश दिला आहे. तर माजी आमदार बाळा भेगडे यांनी तात्काळ प्रतिसाद देत तुम्ही एक हात पुढे केला तर मी दोन हात पुढे करेन असे वक्तव्य करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवली. या परस्पर संवादामुळे मावळ तालुक्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे राजकारण तापण्याचे चिन्ह दिसत आहे. यांनी पुढे बोलताना म्हणाले की आपण तालुक्यात बिनविरोध निवडणुका घेऊ मतभेद विसरून विकासासाठी एकत्र काम करू. राजकीय जाणकारांच्या मते या दोन्ही नेत्यांमधील अशा वक्तव्यामुळे महायुती किंवा सहकार्याच्या नव्या शक्यता निर्माण होत आहेत. मावळ तालुक्यात गेल्या काही वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आणि शिंदे गट या तिन्ही गटांमध्ये स्पर्धा तीव्र राहिली असतात ना आता या संवादामुळे नाव राजकीय प्रारंभ होऊ शकतो अशी चर्चा मावळात होत आहे

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय पायात चप्पल घालणार नाही,धाराशिवचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्षांचा पण

धाराशिवमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे मोठं नुकसान झालं,शेतीसह पिक वाहून गेली शेतकरी कर्जबाजारी झाला तरीही सरकारने शेतकरी कर्जमाफी केली नाही म्हणून धाराशिवचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाल्याशिवाय आपण पायात चप्पल घालणार नसल्याचा पण केला आहे.शेतकऱ्याची हजारो एकर शेती खरडून गेले जमीन नीट कशी करायची हा शेतकऱ्यापुढे प्रश्न आहे,मात्र सरकार तुटपुंजी मदत देत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष असून हीच कर्जमाफीची योग्य वेळ आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर कर्जमाफी करावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष दुधगावकर यांनी व्यक्त केलीय.

जळगाव चिमुकले राम मंदिर उजळले ११५१ दिव्यांनी

जळगाव रुशील मल्टिपर्पज फाउंडेशन संचालित उडान दिव्यांग पुनर्वसन केंद्रातर्फे शहरातील चिमुकले राम मंदिरात सहाला उत्साहपूर्ण वातावरणात दीपप्रज्वलन सोहळा पार पडला.या सोहळ्यात केंद्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी स्वतःहून निर्मित केलेल्या ११५१ दिव्यांचे प्रज्वलन करून संपूर्ण विश्वात शांती, एकात्मता, बंधुत्व, सुख व समृद्धी नांदो, तसेच द्वेष व मत्सराचा अंधार नाहीसा होवो, असा मंगल संदेश दिला. जिल्हाधिकारी रोहन घुगे व जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. उडान फाउंडेशनच्या संचालिका हर्षाली चौधरी व सहकारी यावेळी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सोहळ्याची सुरुवात झाली. या प्रसंगी उपस्थित पाहुण्यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाचे कौतुक करत त्यांच्या प्रयत्नांना प्रेरणादायी असे संबोधले.दिव्यांच्या उजेडात 'उडान' केंद्र परिसर प्रकाशमय झाला होता. या दिव्य उजेडात मानवतेचा संदेश देणारा 'उडान'चा दीपप्रज्वलन सोहळा सर्वांच्या मनाला उजळून गेला.

धर्मादाय आयुक्त अमोघ कलोटी यांची हकालपट्टी करा, रवींद्र धंगेकर यांची मागणी

पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ आणि धर्मादाय आयुक्त अमोघ कलोटी यांनी या सगळ्या गोष्टी केल्या आहेत. टेंडर प्रक्रिया बोगस आहे. यात मोहोळ, पालिका अधिकारी, रजिस्टर हे सगळे एकत्र मिळाले आहेत. या व्यवहारात असलेल्या बँकेचा मॅनेजर हे सुद्धा मोहोळ यांचे मित्र आहेत. कुठल्याही गोष्टी योगायोगाने झाल्या नाहीत हे सगळं या लोकांनी घडवून आणलं आहे. जैन समाजाची जागा हडपण्याचे काम सुरू आहे असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी आज केला आहे.

लक्ष्मीपूजनानिमित्त झेंडूच्या फुलाला प्रचंड मागणी, बाजारात फुलांची मोठी आवक 

सणासुदीच्या काळात झेंडूच्या फुलाची मोठ्या प्रमाणात मागणी असते, दसऱ्यानंतर दिवाळीमध्ये झेंडूच्या फुलाला चांगली मागणी असते. तर आज लक्ष्मीपूजनानिमित्त बाजारात मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलाची आवक झाली आहे. आजच्या दिवशी झेंडूच्या फुलाला महत्त्व असतं , तर अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना झेंडूची शेती आधार देते आहे. बाजारात सध्या 80 ते 90रुपये किलो प्रमाणे फुलांची विक्री होते आहे.

कोल्हापूर : एसटी नसल्याने नाणीजला जाणारे प्रवासी संतापले

तीन तासांहून अधिककाळ वाट पाहून देखील एसटी उपलब्ध झाली नसल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज येथे जाणारे प्रवासी आज संतापले. त्यांनी कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकामधील (सीबीएस स्टँड) रस्त्यावरच ठिय्या मारला. या स्थानकाच्या प्रवेशद्वारामध्ये रास्ता रोको करण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला. रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला.

रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज येथे जाण्यासाठी सायंकाळी सहा वाजल्यापासून काही प्रवासी सीबीएस स्टँड येथे एसटीची प्रतीक्षा करत होते. तासाभरात त्यांची संख्या वाढली. मात्र, सायंकाळी सात, रात्री आठ आणि नऊ वाजता येणाऱ्या अनुक्रमे लातूर, अंबेजोगाई आणि विजापूर-रत्नागिरी या तिन्ही एसटी कोल्हापुरात वेळेत आल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांची गर्दी वाढली. एक-दीड तास उलटला, तरी एसटी आली नाही. त्यांनी नियंत्रण कक्षात विचारणा केली असता, त्यांना एसटी येईल असे सांगण्यात आले. मात्र, त्यानंतर वाट बघून देखील एसटी येत नसल्याचे पाहून या प्रवाशांच्या संयमाचा बांध फुटला. त्यांचा संताप वाढला. त्यातील काही प्रवाशांनी रस्त्यावरच ठिय्या मारला. काहींनी स्टँडच्या प्रवेशद्वारासमोर रास्ता रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वाहतुकीची कोंडी आणि काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्याची माहिती मिळताच शाहुपुरी पोलिस त्याठिकाणी आले. त्यांनी मध्यस्थी करत प्रवाशांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्या दरम्यान कोल्हापूर आगाराच्या व्यवस्थापनाने जादा एसटी उपलब्ध करून दिल्यानंतर प्रवासी शांत झाले आणि त्यांची गर्दी देखील कमी झाली.

घोडबंदरमध्ये हिरानंदानी इस्टेटमध्ये भीषण आग

ठाण्यातील घोडबंदर रोड वरील हिरानंदानी इस्टेट या ठिकाणी बेसिलियम टॉवर या इमारतीच्या 31 व्या मजल्यावरील गॅलरी मध्ये ठेवण्यात आलेला लाकडी सोफा आणि इतर साहित्य जळून खाक झाले आहे. सदरची आग आटोक्यात आणण्यात आली आहे.तर वागळे इस्टेट येथे ऐका गॅरेजला आग लगली होती. तर शिळफाटा या ठिकाणी ऐका मंडप डेकोरेशन चा दुकानाला आग लागली होती. यां घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये

Maharashtra Live News Update : उल्हासनगरमध्ये ऑफिस खुर्ची बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री भीषण आग

उल्हासनगर कॅम्प क्रमांक चार येथील मराठा सेक्शन परिसरातील जुन्या मटन मार्केटजवळ असलेल्या ऑफिस खुर्च्या बनवणाऱ्या कारखान्याला रात्री दीडच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. भर वस्तीत आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली व नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली.घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या सहा गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशामक दलाने चारही बाजूंनी पाण्याचा मारा करत तब्बल एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी स्थानिकांच्या मते फटाक्यामुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस आणि महापालिका अधिकारी तपास करत आहेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com