Rain : राज्यात अनेक ठिकाणी परतीच्या पावसाने झोडपलं; नांदेड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

Nanded Washim News : दिवाळी सणाच्या दिवशी जोरदार पाऊस झाल्याने बाजारपेठांमध्ये धावपळ उडाल्याचे पाहण्यास मिळाले. तर आता वेचणीला आलेल्या कापसाचे देखील या पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता
Maharashtra Rain
Maharashtra RainSaam tv
Published On

Maharashtra Rain : हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागात परतीचा जोरदार पाऊस झाला. नांदेड, यवतमाळ, वाशीम जिल्ह्यासह अनेक भागात जोरदार पाऊस झाला. दिवाळी सणाच्या दिवशी जोरदार पाऊस झाल्याने बाजारपेठांमध्ये धावपळ उडाल्याचे पाहण्यास मिळाले. दरम्यान हवामान खात्याच्या वतीने आज नांदेड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

नांदेड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट 
नांदेड : नांदेड शहरासह जिल्ह्यात आज परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ऐन दिवाळीच्या सणात परतीच्या पावसाने नांदेड जिल्ह्यातील अनेक भागाला झोडपले. आज हवामान खात्याकडून नांदेड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतात काढून ठेवलेल्या सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Rain
Solapur : पूरग्रस्थाची दिवाळी अंधारात; सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत

वाशिम मध्ये पावसाची दमदार हजेरी
वाशीम : वाशिममध्ये दिवाळीची धामधूम तर शेत शिवारात सोयाबीन काढणीच्या हंगाम सुरू असताना वाशिममध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. वातावरणात बदल होत पावसाने दमदार हजेरी लावल्याने दिवाळीनिमित्त रस्त्यावर लावलेल्या दुकानदारांसह शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Maharashtra Rain
Ration Shop : दिवाळी सणात निकृष्ट दर्जाचे रेशन धान्य वाटप; आळ्या, किडे असलेले धान्य मिळाल्याने नागरिकांचा संताप

यवतमाळमध्ये परतीच्या पावसाने झोडपलं
यवतमाळ जिल्ह्यातील अनेक भागात परतीच्या पावसाने झोडपुन काढले आहे. सध्या जिल्ह्यात सोयाबीन काढणी सुरू आहे. अशात परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ऐन दिवाळीच्या दिवशी परतीच्या पावासची हजेरी लावली असून परतीच्या पावसाचं सोयाबीन व कापसाला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मावळमध्ये दुपारी पाऊस 

ऐन दिवाळीच्या दिवशी मावळ्यात पावसाला सुरुवात झाली आहे. दिवाळीची खरेदी करण्याकरिता अनेक नागरिक बाहेर पडले होते. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची त्रेधा उडाली. दिवसभर ऊन तापत होते आणि दुपारी चार वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. गेले महिनाभर मावळत तुका निर्माण झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com