ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकदा आपण दिवसभर सतत लॅपटॉपवर काम करतो.
या सगळ्या गोष्टींमुळे डोळ्यांवर अधिक ताण येतो. यामुळे डोळ्यांच्या समस्या वाढतात.
डोळ्यांच्या काही समस्यांवर आपण घरच्या घरीदेखील उपाय करू शकतो.
काकडी डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. काकडीचा वापर केल्यास डोळे दुखण्यापासून आराम मिळतो.
थंड पाण्याने डोळे धुतल्याने डोळ्यांवरील थकवा दूर होतो.
डोळ्यातील वेदना आणि जळजळ दूर करण्यास गुलाबपाणी आपल्याला मदत करू शकते.
थंड दूध डोळ्यांवरचा ताण दूर करण्यासाठी चांगला उपाय आहे.
बर्फाचा शेक देखील डोळ्यांचा थकवा दूर करण्यासाठी फायदेशीर आहे.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.