साम टिव्ही
उन्हाचा पारा वाढू लागला आहे. या उन्हामुळे उष्माघाताचा त्रास होण्याची मोठी शक्यता असते.
कडक उन्हाकडे दुर्लक्ष केल्यास उष्माघाताचा त्रास होऊन गंभीर त्रास होऊ शकतो. यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.
उष्माघात झाल्यास थकवा येणे, मळमळ होणे, ताप या सारखे लक्षणे आजारी व्यक्तीमध्ये आढळतात.
तीव्र उन्हात शारीरिक श्रमाची, कष्टाची कामे बराच वेळ केल्यामुळे उष्माघात होण्याची शक्यता असते.
कारखान्याच्या बॉयलर रूममध्ये अधिक वेळ काम केल्याने उष्माघाताचा त्रास जाणवण्याची शक्यता असते.
जास्त तापमानाच्या खोलीमध्ये अधिक वेळ काम केल्याने उष्माघाताचा त्रास जावणतो.
जीन्ससारखे घट्ट कपडे नियमितपणे वापरल्याने उष्माघाताचा त्रास जाणवतो.
व्यक्तीने कोणतही काळजी न घेता उन्हात जास्तवेळ फिरल्याने उष्माघाताचा त्रास जाणवतो.