Heart Attack: सकाळची ही सवय वाढवते हार्ट अटॅकचा धोका; रक्तवाहिन्या का होतात ब्लॉक?

Morning Habits: सकाळचा नाश्ता टाळण्याची सवय हृदयासाठी घातक ठरू शकते. ही छोटी चूक कोलेस्ट्रॉल वाढवते, धमनी ब्लॉकेज निर्माण करते आणि हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी वाढवते.
Morning Habits
Heart Attacksaam tv
Published On
Summary

नाश्ता टाळल्याने कोलेस्ट्रॉल आणि कोर्टिसोल वाढतो.

धमनी ब्लॉकेजमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.

नाश्ता केल्याने रक्तातील साखर आणि मेटाबॉलिझम संतुलित राहतो.

पौष्टिक नाश्ता केल्याने हृदय आरोग्य सुधारते आणि ताण कमी होतो.

सकाळची घाईगडबड, ऑफिसला लवकर पोहोचण्याची धडपड किंवा काही मिनिटांची जास्त झोप या सगळ्यात आपण नाश्ता टाळता का? जर होय, तर आता सावध होण्याची गरज आहे. कारण सकाळचा नाश्ता टाळण्याची ही छोटी सवय तुमच्या हृदयाच्या आरोग्यावर मोठा परिणाम करू शकते.

सकाळचा नाश्ता शरीराला आवश्यक ऊर्जा देतो आणि रात्रीच्या उपवासानंतर मेटाबॉलिझम पुन्हा कार्यरत करतो. पण जर नाश्ता केला नाही, तर शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी साठवलेले ग्लुकोज आणि फॅट वापरावे लागते. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण अनियमित होते. इतकेच नाही, तर शरीरात ‘कोर्टिसोल’ या स्ट्रेस हार्मोनचे प्रमाण वाढते, जे रक्तदाब आणि हृदयाच्या ठोक्यांवर परिणाम करते.

Morning Habits
Cholesterol Facts: कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत?

हार्ट अटॅक का घातक आहे?

ब्रेकफास्ट स्किप केल्याने शरीरात ‘वाईट कोलेस्ट्रॉल’चे प्रमाण वाढते. हे कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक जमा करून रक्तप्रवाहात अडथळा निर्माण करत. ज्यामुळे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो. तसेच, जास्त वेळ पोट रिकामे राहिल्याने शरीरात ताण वाढतो आणि रक्तदाब सतत उच्च राहू शकतो. हे हृदयावर अनावश्यक ताण आणते.

याशिवाय, नाश्ता न केल्याने शरीराची इन्सुलिन सेंसिटिव्हिटी कमी होते. ज्यामुळे रक्तातील साखर असंतुलित राहते आणि टाईप-2 डायबिटीजचा धोका वाढतो. हा डायबिटीज हृदयविकाराचा एक प्रमुख घटक मानला जातो.

अनेकांना वाटते की नाश्ता टाळल्याने वजन कमी होईल, पण प्रत्यक्षात उलट परिणाम दिसतो. सकाळी उपाशी राहिल्याने दिवसभरात जास्त कॅलरीयुक्त आणि अनहेल्दी पदार्थ खाण्याची इच्छा वाढते. यामुळे वजन वाढते आणि स्थूलतेमुळे हृदयविकाराचा धोका अधिक वाढतो. काही संशोधनांनुसार, नाश्ता टाळणाऱ्यांच्या शरीरात सूज वाढवणारे घटक (inflammatory markers) जास्त प्रमाणात आढळतात, जे धमनींना हानी पोहोचवतात.

Morning Habits
Vashi Fire: नवी मुंबईत मोठ्या इमारतीत भीषण आग; चिमुकलीसह चौघांचा मृत्यू, घटनेमागे वेगळंच कारण समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com