Cholesterol Facts: कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत?

Diet Tips: कोलेस्ट्रॉलचे महत्त्व, योग्य प्रमाण, आणि संतुलित आहाराने ते कसे नियंत्रित ठेवावे हे जाणून घ्या. हृदयासाठी उपयुक्त सवयी व आहार मार्गदर्शक माहिती.
Diet Tips
Cholesterol Factsgoogle
Published On
Summary

शरीराला काही प्रमाणात कोलेस्ट्रॉलची आवश्यकता असते.

सॅच्युरेटेड फॅट्स कमी ठेवणे हृदयासाठी फायदेशीर आहे.

ओमेगा-३ आणि फायबरयुक्त अन्न एलडीएल कमी करण्यात मदत करते.

कोलेस्ट्रॉल म्हणजे नेमकं काय आणि ते किती प्रमाणात घ्यावं हे जाणून घेणं आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. अनेकदा आपण कोलेस्ट्रॉल वाईट असतं असं ऐकतो, पण खरं तर शरीराला काही प्रमाणात कोलेस्ट्रॉलची गरज असते. मात्र, त्याचं संतुलन राखणं अत्यावश्यक आहे. पुढे आपण याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

पूर्वीच्या आहार पद्धतीनुसार दररोज ३०० मिलिग्रॅमपर्यंत कोलेस्ट्रॉल घेण्याची मर्यादा ठरवण्यात आली होती. तर हार्ट अटॅक असलेल्या व्यक्तींसाठी ही मर्यादा २०० मिलिग्रॅम होती. पण अलीकडील संशोधनानुसार ही मर्यादा आता निश्चित केली गेलेली नाही. कारण आहारातील कोलेस्ट्रॉल थेट रक्तामधीस कोलेस्ट्रॉल वाढवतोच असं नाही, हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालं आहे.

Diet Tips
Diwali Simple Rangoli: दिवाळीत कमी वेळेत सुंदर आणि सोपी रांगोळी काढायचीये? मग या डिजाईन्स पाहाच

खरं तर, रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढवण्यामागे मुख्य कारण म्हणजे सॅच्युरेटेड फॅट्स किंवा चरबी आहे. या प्रकारच्या चरबीचा वापर कमी ठेवणं हेच हृदयासाठी अधिक फायद्याचं आहे. त्यामुळे USDA (अमेरिकेचे कृषी विभाग) दररोजच्या कॅलरीपैकी 10% पेक्षा कमी प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट्स घेण्याचा सल्ला देतात. अमेरिकन हार्ट असोसिएशनने तर ही मर्यादा आणखी कमी करून 6% केली आहे.

जनुकीय कारणांमुळे काही लोकांमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त राहू शकतं. जसे की फॅमिलियल हायपरलिपिडेमिया सारख्या स्थितीत. त्यामुळे सर्वांसाठी एकसमान नियम लागू होत नाही. काही व्यक्तींना आहारातील कोलेस्ट्रॉलमुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढतो, तर काहींना त्याचा परिणाम जाणवत नाही.

अशावेळी मेडिटेरेनियन डाएट किंवा DASH डाएट सारख्या हृदयासाठी फायदेशीर आहार पद्धतींचा अवलंब करणे चांगले ठरते. या आहारात फळं, भाज्या, सुका मेवा, कडधान्ये, आणि संपूर्ण धान्यांचा समावेश असतो, तर साखर, मीठ आणि सॅच्युरेटेड फॅट्स कमी ठेवले जातात. शिवाय, ओट्स, बीन्स, सफरचंद यांसारख्या अन्नपदार्थांतील सॉल्युबल फायबर म्हणजे विद्रव्य तंतू हे रक्तातील एलडीएल (वाईट कोलेस्टेरॉल) कमी करण्यात मदत करतात. तसेच, ब्रोकोलीसारख्या काही भाज्यांमध्ये असणारे स्टेरॉल्स आणि स्टॅनॉल्स हे संयुग शरीरात कोलेस्टेरॉलचे शोषण कमी करतात.

Diet Tips
Lakshmi Pujan 2025: लक्ष्मीपूजनाला सोने-चांदीऐवजी या ४ वस्तू घरी आणा; वर्षभर पैशांची कमी जाणवणार नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com