बदकाची आणि कमळाची रांगोळी
जर तुम्हाला रंगीत आणि आकर्षक रांगोळी हवी असेल, तर बदक आणि कमळाच्या फुलांचं हे कॉम्बिनेशन अगदी परफेक्ट आहे. या डिझाईनमध्ये वेगवेगळ्या रंगांचा वापर करून तुमच्या अंगणात एक वेगळंच सौंदर्य खुलून दिसेल. ही रंगोली तयार करणं सोपं असून पाहणाऱ्यांच्या नजरा तिच्यावर खिळतील.
सिंपल राउंड पॅटर्न रांगोळी
ही रांगोळी अगदी सोप्या पॅटर्नमध्ये तयार करता येते. फक्त काही बेसिक आकार आणि रंग वापरून ही रंगोली बनवता येते. दिसायला ही डिझाईन इतकी सुंदर असते की, पाहणाऱ्यांना विश्वासच बसणार नाही की ही रांगोळी तुम्ही स्वतः बनवली आहे.
श्री गणेश रांगोळी
लक्ष्मीपूजन आणि दिवाळीच्या शुभ दिवशी श्री गणेशाची आकृती असलेली रांगोळी अत्यंत मंगल मानली जाते. एक साधी चौकोनी रंगोली काढा आणि त्यावर रंग भरल्यानंतर ब्रश किंवा हाताने गणेशजींची आकृती तयार करा.
धनलक्ष्मी रांगोळी
धनलक्ष्मी रंगोली ही कलश, कमळ, स्वस्तिक आणि नाण्यांच्या चिन्हांनी सजवलेली असते. ही रांगोळी समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक आहे. चॉकने आधी आउटलाइन काढा आणि त्यानंतर रंग भरा.
शुभ दीपावली पॅटर्न
जर तुमचं घर लहान असेल आणि अंगणात रंगोली बनवणं शक्य नसेल, तर घराच्या भिंतीलगत किंवा दाराजवळ हा पॅटर्न बनवा. लहान जागेत तयार होणारी ही रांगोळी घराच्या सौंदर्यात भर घालते.
मोर रांगोळी डिझाईन
मोर रांगोळी ही सर्वात आकर्षक आणि रंगीबेरंगी मानली जाते. थोडं बेसिक ड्रॉइंग येत असेल, तर ही रांगोळी बनवणं सोपं आहे. निळा, हिरवा आणि पिवळा रंग वापरून मोराच्या पिसासारखी रांगोळी तयार करा आणि तुमच्या दिवाळीला रॉयल टच द्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.