Elon Musk Saam Tv
लाईफस्टाईल

Elon Musk on X: एक्स मीडियावर अडल्ट व्हिडिओ अपलोड करण्याला परवानगी; भारतात अॅप बॅन होणार?

Elon Musk Approve Uploading Of Adult Video On 'X': एक्स मीडियावर अडल्ट व्हिडिओ अपलोड करण्याला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे एलॉन मस्क यांनी अडल्ट पॉलिसीला मंजुरी दिली आहे. त्यानंतर भारतात अॅप बॅन होणार, अशी चर्चा सुरु झाली आहे.

Vishal Gangurde

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सने पॉलिसीत मोठा बदल केला आहे. एलॉन मस्क यांनी एक्स वर अडल्ट व्हिडिओ अपलोड करण्याची मंजुरी दिली आहे. एलॉन मस्क स्वत: इन्स्टाग्रामवर न्यूडिडीला प्रोत्साहन दिलं जातं, असा आरोप करायचे. त्यानंतर आता मस्क यांच्या एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अडल्ट व्हिडिओ अपलोड करण्याची मंजुरी मिळाली आहे.

अडल्ट व्हिडिओ कोणाला पाहायला मिळणार, कोणाला नाही, याबाबत मार्गदर्शक तत्वे देखील जाहीर करण्यात आले आहेत. एक्स मीडियावर अडल्ट व्हिडिओ अपलोड करण्याची परवानगी मिळाल्यानंतर भारतात या अॅपवर बंदी घालण्यात येणार का, यावर एकच चर्चा सुरु झाली आहे. भारतात अडल्ट वेबसाईट्स बंदी घालण्यात आली आहे.

मागील आठवड्यात शनिवारी एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर न्यूडिटीशी संबंधित हॅशटॅग ट्रेंडमध्ये होता. लोकसभा निकालाच्या दिवशी एक्स सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर न्यूडिटीशी संबंधित शब्द ट्रेंडमध्ये होता. ४० लाख युजर्सने या हॅशटॅगचा वापर केला होता.

काय आहे नवी पॉलिसी?

एक्स मीडियावर अनेक अकाऊंटवरून अडल्ट मजकूर शेअर करण्यात आले आहेत. या अकाउंटला 'नॉट सेफ फॉर वर्क' म्हटलं जातं. त्यानंतर आता मस्क यांनी नव्या अडल्ट पॉलिसीला मंजुरी दिली आहे. यामुळे सर्व आश्चर्यचकीत झाले आहेत.

भारतात एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालणार?

भारतात अडल्ट वेबसाईट्सवर बंदी आहे. तुम्हाला वेबसाईट्स अॅक्सेस करता येत नाही. याचदरम्यान, एक्स प्लॅटफॉर्मवर अडल्ट व्हिडिओ अपलोड करण्याला परवानगी मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे भारतात एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे. परंतु एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अडल्ट वेबसाईट्समध्ये मोडत नाही. त्यामुळे यावर बंदी घालण्यात येण्याची शक्यता कमी आहे. मात्र, भविष्यात एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कारवाई होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT