

बीएमसी निवडणुकीआधी वरळीत ठाकरे गटाची डोकेदुखी वाढली
बंडखोर उमेदवारांमुळे आदित्य ठाकरेंसमोर आव्हान
ठाकरे बंधू एकत्र असूनही स्थानिक असंतोष कायम
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर 19 वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आले.त्यामुळे महापालिकेच्या विजयाचे आडाखे बांधले जात होते. मात्र आता ठाकरे बंधू एकत्र आले असले तरी वरळी मतदारसंघातच बंडखोरांनी आदित्य ठाकरेंचं टेन्शन वाढवलंय.ते नेमकं कसं पाहूयात.
वरळी कोळीवाड्यातील वॉर्ड 193 मधून हेमांगी वरळीकरांना उमेदवारी देण्यात आली.. त्यामुळे नाराज झालेल्या सुर्यकांत कोळींनी ठाकरेसेनेचा राजीनामा देत बंडखोरी केलीय.. तर 194 मध्ये निशिकांत शिंदेंना राजीनामा दिल्यानं शैलजा पवार यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केलीय. वॉर्ड 196 मध्ये आशिष चेंबूरकरांच्या पत्नी पद्मजा चेंबूरकरांना उमेदवारी दिल्यानं संगीता जगतापांनी बंडखोरी केलीय.. तर वॉर्ड 197 मध्ये रचना साळवींना उमेदवारी मिळाल्यानं श्रावणी देसाई अपक्ष निवडणूक लढवत आहेत.
खरंतर 2017 च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेनं वरळीतील सर्व 6 जागा जिंकल्या होत्या. त्यातच शिवसेनेच्या फुटीनंतरही वरळीनं ठाकरेसेनेलाच साथ दिली.मात्र विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे अवघ्या 8800 मतांनी निवडून आले. त्यामुळे वरळीवरचा होल्ड कमी होण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच आता महापालिका निवडणुकीत वरळीच्या बालेकिल्ल्यातच बंडखोरी उफाळून आलीय.
ही बंडखोरी शमवण्यासाठी आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरेंनी प्रतिष्ठा पणाला लावली. मात्र ठाकरेंचं ऑपरेशन मनधरणी सपशेल फेल ठरलंय. त्यामुळे बंडखोरांचं आव्हान मोडून निष्ठावंत शिवसैनिकांच्या साथीनं ठाकरे वरळीचा बालेकिल्ला राखणार की भाजप बंडखोरांना ताकद देऊन वरळीची तटबंदी भेदणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.