5,000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा! नवीन Realme C63 स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमत

Realme C63: आघाडीची मोबाईल उत्पादक Realme ने आपला नवीन C63 लॉन्च केला आहे. याच्या किंमत आणि फीचर्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...
5,000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा! नवीन Realme C63 स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमत
Realme C63Saam Tv

प्रसिद्ध मोबाईल उत्पादक कंपनी Realme ने आपला नवीन बजेट स्मार्टफोन Realme C63 लॉन्च केला आहे. सध्या हा फोन इंडोनेशियात सादर करण्यात आला आहे. अलीकडेच हा फोन भारतीय सर्टिफिकेशन साइट BIS आणि Geekbench वर देखील दिसला आहे.

Realme C63 फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि HD प्लस डिस्प्लेसह Unisock प्रोसेसर देण्यात आला आहे. ग्राहक याचे स्टोरेज SD कार्डच्या मदतीने 2TB पर्यंत वाढवू शकतात. यातच याच्या किंमत आणि फीचर्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

5,000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा! नवीन Realme C63 स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमत
50MP कॅमेरा अन् 12GB रॅमसह Nothing Phone 2a Special Edition लाँच; जाणून घ्या किंमत

Realme C63 च्या बेस व्हेरिएंट 6GB/128GB मॉडेलची किंमत आयडीआर 1,999,000 (अंदाजे 10,255 रुपये) आहे. तर याच्या 8GB/128GB मॉडेलसाठीची किंमत 2,299,000 आयडीआर (सुमारे 11,794 रुपये) आहे. याची विक्री 5 जूनपासून इंडोनेशिया आणि मलेशियामध्ये सुरू होईल.

स्पेसिफिकेशन

यात HD+ रिझोल्यूशनसह 6.74 इंच IPS LCD पॅनेल ग्राहकांना मिळेल. ज्यामध्ये टच सॅम्पलिंग रेट 180Hz आहे आणि पीक ब्राइटनेस 450 nits आहे. चांगल्या परफॉर्मन्ससाठी यात Unisock चा T612 प्रोसेसर देण्यात आला आहे. ज्यामध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आलं आहे.

5,000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा! नवीन Realme C63 स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमत
399cc इंजिन आणि फ्यूचरिस्टिक लूक; नवीन Kawasaki Ninja ZX-4RR भारतात लॉन्च, किंमत किती?

कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, यात 50-मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेरासह डेप्थ सेन्सर आहे. याशिवाय सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी समोर 8 मेगापिक्सेल कॅमेरा यात ग्राहकांना मिळेल. हा फोन Android 13 वर काम करतो. सेफ्टीसाठी यात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक आहे. Realme C63 ला पॉवर देण्यासाठी कंपनीने यात मोठी 5,000mAh बॅटरी दिली आहे, जी 45W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com