Fact Check: सरकार देणार 1 तोळा सोनं? मोफत सोनं देण्याची सरकारची योजना? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Fact Check Free 1 Tola Gold Scheme: मोदी सरकार १ तोळा सोने मोफत देत असल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या दाव्यामागील सत्य काय हे जाणून घेऊ.
Fact Check  Free 1 Tola Gold Scheme:
Fact check image showing viral video claim about free gold scheme and its reality.saam tv
Published On
Summary
  • 1 तोळा सोनं मोफत देण्याचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल

  • व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदींचा आवाज व व्हिज्युअल एडिटेड

  • सरकारकडून अशी कोणतीही योजना जाहीर नाही

व्हायरल होत असलेल्या बातम्यांची आम्ही पडताळणी करतो.आणि सत्यता समोर आणतो. आता असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्या व्हिडिओत स्वत: मोदी आता 1 तोळं सोनं मोफत देणार असल्याचं सांगतायत. पण, खरंच या व्हिडिओत तथ्य आहे का.? याची आम्ही पडताळणी केली.त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

हा व्हिडिओ ऐकलात. स्वत: पंतप्रधान मोदीच सांगतायत की सोनं महाग असूनही आधारकार्डवर 1 तोळा सोनं सरकार मोफत देणार आहे. मोदी ही घोषणा करतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय...पण, घरात कुणीही सरकारी नोकरदार नसावा अशी अट असल्याचं सांगण्यात आलंय. मात्र, सरकार खरंच 1 तोळं सोनं देतंय का? सरकार मोफत सोनं का देतंय? अशीच चर्चा सगळीकडे सुरू आहे.

Fact Check  Free 1 Tola Gold Scheme:
चार दिवस काम ३ दिवस सुट्टी; भारतात लागू होणार नवा नियम? कसं असेल तुमच्या ड्युटीचं शेड्यूल

इन्टाग्रामवर संजय अन्नू साहू नावाच्या एका युजरने हा व्हिडिओ अपलोड केलाय. या व्हिडिओत स्वत: मोदीच घोषणा करत असल्याचं दिसतंय. त्यामुळे अनेकांना यावर विश्वास बसू लागलाय...खरंच मोदी सरकार आता मोफत सोनं देणार आहे का.?

सध्या सोन्याचा दर 1 लाख 35 हजारांपेक्षा जास्त आहे.तरीही एवढं महाग सोनं सरकार लोकांना का देणार आहे.? आणि खरंच सरकार सोनं देत असेल तर ते कसं मिळवायचं.? असे अनेक प्रश्न उपस्थित झालेयत.त्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली. याबाबत आम्ही सरकारकडूनच माहिती मिळवली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

Fact Check  Free 1 Tola Gold Scheme:
मार्च 2026 पासून 500 च्या नोटा बंद होणार? ATM मधून निघणार नाही 500ची नोट?

व्हायरल सत्य/ साम इन्व्हिस्टिगेशन

मोफत एक तोळं सोनं सरकार देणार नाही

सरकारची अशी कोणतीही योजना नाही

पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ AI निर्मित

मोफत सोन्यासाठी कोणताही अर्ज भरू नका

अर्ज भरण्याच्या नावाने तुमची फसवणूक होऊ शकते

सध्या सोनं चांदी प्रचंड महागलंय. गरिबांना ते घेणं परवडणारंही नाही. त्यामुळे असे मेसेज, व्हिडिओ व्हायरल केले जातायत. लोकांना खरं वाटावं म्हणून मोदींचाच व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय. आणि आवाज AIच्या माध्यमातून लावण्यात आलाय. त्यामुळे अशा भूलथापांना बळी पडू नका. खोटी आमिष दाखवून तुमची फसवणूक होऊ शकते.आमच्या पडताळणीत सरकार 1 तोळा सोनं देणार असल्याचा दावा असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com