मार्च 2026 पासून 500 च्या नोटा बंद होणार? ATM मधून निघणार नाही 500ची नोट?

Truth Behind Viral Message: सध्या एक खळबळजनक मेसेज व्हायरल होतोय... या मेसेजमुळे सर्वसामान्यांच्या पोटात गोळा आलाय. दावा केला जातोय की, मार्च 2026 पासून एटीएममधून 500 रुपयांच्या नोटा निघणार नाहीत. आरबीआय या नोटा चलनातून बाद करणार आहे...पण खरंच या दाव्यात तथ्य आहे का?
Viral message claiming ₹500 notes will be banned from ATMs is false, says RBI
Viral message claiming ₹500 notes will be banned from ATMs is false, says RBISaam Tv
Published On

पाचशे रुपयांची नोट आता बंद होणार असा दावा करण्यात आलाय... सोशल मीडियावर हा मेसेज प्रचंड व्हायरल होतोय... पण खरंच 500 रुपयांची नोट सरकार बंद करणार आहे का...? 500 ची नोट बंद करून दुसरी नोट चलनात आणली जाणार आहे का...? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत... त्यामुळे आम्ही याची सत्य माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला...

​गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर एक पोस्ट वेगाने पसरतेय. त्यात असं म्हटलंय की, 1 मार्च 2026 पासून एटीएममध्ये 500 च्या नोटा मिळणार नाहीत.RBI 500च्या नोटांचं वितरण थांबवणार आहे.

हा दावा केल्यामुळे एकच खळबळ उडालीय...हळूहळू या नोटा चलनातून पूर्णपणे बाहेर केल्या जातील. ​या दाव्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे, कारण सध्या दैनंदिन व्यवहारात 500 ची नोट सर्वात महत्त्वाची आहे...त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे... हा लोकांच्या दैनंदिन व्यवहारातील विषय असल्याने आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली... सर्वात आधी याची माहिती आरबीआयकडून मिळवण्याचा प्रयत्न केला... पण, आरबीआयच्या साईटवर अशी कोणतीची 500 च्या नोटेसंदर्भात माहिती मिळाली नाही... त्यामुळे आमच्या पडताळणीत काय समोर आलं पाहुयात...

आरबीआयने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही

मेसेज निव्वळ अफवा पसरवण्यासाठी व्हायरल केलाय

​RBI ने वेबसाईटवर अधिसूचना प्रसिद्ध केलेली नाही

500 ची नोट हे सध्या देशातील सर्वात मोठं चलन

नोट बंद करण्याचा कोणताही विचार सरकारचा नाही

व्हायरल सत्यच्या टीमने या दाव्याची पडताळणी केली असता धक्कादायक वास्तव समोर आलं...

भारत सरकारच्या 'प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो'ने या व्हायरल मेसेजची दखल घेतलीय...त्यामुळे आमच्या पडताळणीत 500 रुपयांची नोट 1 मार्चपासून बंद होणार, नोट एटीएममधून निघणारच नाही हा दावा असत्य ठरलाय... त्यामुळे अशा मेसेजवर विश्वास ठेवू नका... ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com