

महापालिका निवडणुकीआधी महायुतीत विचारधारेवरून संघर्ष
भाजप नेते आशिष शेलारांचा अजित पवारांना सावरकर विचारांवर इशारा
राष्ट्रवादी अजित पवार गटाचा भाजपला जोरदार प्रतिवाद
पुणे आणि पिपंरी चिंचवड महापालिकेत भाजप आणि अजितदादांची राष्ट्रवादीत आमनेसामने आलीय. अशातच भ्रष्टाचाराचा आरोप, युतीधर्मांची आठवण ते विचारसरणीची लढाई असा हा संघर्ष दिवसेंदिवस वाढत चाललाय. भाजपच्या आशिष शेलारांनी तर अजितदादांच्या पक्षाला सावरकर विचार मान्य करावेच लागतील, असा इशारा दिलाय.दुसरीकडे शेलारांच्या टीकेला प्रयत्तुर देताना राष्ट्रवादी आपली विचारधारा सोडणार नसल्याचा पलटवार आमदार अमोल मिटकरींनी केलाय.
तर दुसरीकडे दोन्ही पक्षांच्या राज्यातल्या सर्वोच्च नेतृत्वांनी मात्र समोपचाराची भूमिका घेतल्याचं दिसतंय. महापालिका निवडणुकीत एकीकडे भाजप हिंदूत्वाचा मुद्दा आक्रमकपणे मांडतेय. तर दुसरीकडे अजित पवार राष्ट्रवादी फुले-शाहू आंबेडकर विचारांप्रती कटिबद्धता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतायत.त्यातच पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी आता थेट विचारसरणीपर्यंत पोहचल्या आहेत. त्यामुळे या विचारसरणीच्या वादाचा भविष्यात महायुतीवर परिणाम होणार का याकडे लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.