Pakistan Ban X: पाकिस्तानात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X का झालं ब्लॉक?

Pakistan Government Ban X : पाकिस्तानात एलन मस्कला मोठा धक्का बसलाय. पाकिस्तान सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर बंदी घातलीय. तेथील सरकारने यापूर्वीच मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X वर बंदी घालण्याबाबत आदेश जारी केला होता. पाकिस्तानमध्ये X वर बंदी का घालण्यात आली हे जाणून घेऊ.
Pakistan Ban X: पाकिस्तानात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X का झालं ब्लॉक?
Pakistan Banned Social Media Platform Xgoogel
Published On

Pakistan Banned Social Media Platform X: पाकिस्तानने एलन मस्कच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (ट्विटर) वर बंदी घातलीय. पाकिस्तान सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव फेब्रुवारीमध्येच X वर बंदी घालण्याचे आदेश दिले होते. मात्र आज पाकिस्तान सरकारने या बंदीला अधिकृत दुजोरा दिलाय.

दरम्यान एक्सवर बंदी घालण्याप्रकरणी पाकिस्तानच्या सिंध हाय कोर्टाने पाक सरकारला फटकारलं आहे. एलन मस्कच्या मायक्रोब्लॉगिंग साइट एक्सवरील एका आठवड्यात काढण्यात, यावी असे आदेश न्यायालयाने दिलेत. मात्र आज पाकिस्तान सरकारने या बंदीला अधिकृत दुजोरा दिलाय. दरम्यान एक्सवर बंदी घालण्याप्रकरणी पाकिस्तानच्या सिंध हाय कोर्टाने पाक सरकारला फटकारलं आहे. एलन मस्कच्या मायक्रोब्लॉगिंग साइट एक्सवरील एका आठवड्यात काढण्यात यावी असे आदेश न्यायालयाने दिलेत.

यावर्षी फेब्रुवारीमध्ये अनेक पाकिस्तानी युझर्संने त्यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वापरता येत नसल्याचं म्हटलं होतं. म्हणजेच यावर्षाच्या फेब्रुवारी २०२४ पासून X चालू नव्हते. वृतानुसार, फेब्रुवारी २०२४ पासून ट्विटर (X) पाकिस्तानमध्ये काम करत नाहीये. यामुळे पाकिस्तानात एक्सला बंदी घालण्यात आल्याचा स्पष्ट झालंय.

पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका झाल्या. या काळात पाकिस्तान सरकारने अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला ब्लॉक केले होतं. पाकिस्तानमध्ये मतदानाच्या दिवशी दिवसभर इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान निवडणुका झाल्यानंतर पाकिस्तानात इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म परत सुरू झाल्या. परंतु एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील युझर्स एक्स वापरू शकत नाहीयेत.

यात दरम्यान पाकिस्तानच्या सिंध उच्च न्यायालयाने दूरसंचार प्राधिकरणाला एक्स प्लॅटफॉर्मची सेवा पूर्ववत करण्याचे आदेश दिले होते. परंतु सरकारने एक्स प्लॅटफॉर्मची सेवा पूर्ववत केली नाही. आता सरकारने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून X ला राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका आहे, त्यामुळे अजून बंदी असल्याचं सांगितलं.

Pakistan Ban X: पाकिस्तानात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X का झालं ब्लॉक?
CAA Act : भारताने आतापर्यंत पाकिस्तान, बांगलादेशातील किती लोकांना दिलं नागरिकत्व? समोर आली मोठी आकडेवारी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com