Shravan 2024  SAAM TV
लाईफस्टाईल

Shravan 2024 : चुकूनही खाऊ नका श्रावणात हिरव्या भाज्या, राहाल आजारांपासून दूर!

Monsoon Health : श्रावण महिना पावसाळ्यात येत असल्यामुळे आपल्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. श्रावणात चांगल्या आरोग्यासाठी हिरव्या भाज्या खाणे टाळावे. कारण जाणून घ्या.

Shreya Maskar

श्रावणात अनेक लोक खूप पथ्यपाणी पाळतात. श्रावणात भगवान शंकराची पूजा केली जात असून श्रावणी सोमवारी उपवास केला जातो. श्रावणात सर्वत्र हरवळ पाहायला मिळत जरी असली तरी आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करू नये. श्रावणात उत्तम आरोग्यासाठी हिरव्या भाज्या खाणे टाळावे.

श्रावणात का टाळाव्या हिरव्या भाज्या?

श्रावणात हिरव्या भाज्या खाणे टाळावा. कारण श्रावण महिना हा पावसाळ्यात येत असल्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यातील दमट वातावरणामुळे शरीरात वात निर्माण होऊ शकतो. यामुळे हिरव्या भाज्या खाणे टाळावे. पावसाळ्यात वात, पित, ताप , सर्दी, खोकला यांचा धोका वाढतो. पावसाळ्यात हिरव्या भाज्यांच्या स्वच्छतेविषयी चिंता वाटते. कारण हिरव्या भाज्यांवर धूळ आणि मातीचे प्रमाण इतर भाज्यांच्या तुलनेत जास्त असते. जे आरोग्यास घातक ठरते. याचा परिणाम तुमचा आरोग्यावर होऊन पोटासंबंधित समस्या उद्भवतात. पावसाळ्यात हवामानातील गारठ्यामुळे आधीच पचनक्रिया मंदावलेली असते. त्यामध्ये खराब अन्न खाल्ल्याने अपचनाच्या समस्या निर्माण होतात. उदा. ॲसिडीटी

श्रावणात कोणत्या भाज्या खाऊ नये?

पालक, कोबी, हिरवा कांदा, ब्रोकोली ,मेथी, मुळ्याची पाने, स्प्राउट्स , हिरव्या भाज्या विशेषतः श्रावणात वांगी खाऊ नये.

श्रावणात कोणत्या गोष्टी टाळाव्यात?

  • श्रावणामध्ये जेवणात कांदा आणि लसूण घालू नये.

  • श्रावण पावसाळ्यात येत असल्यामुळे पचनक्रिया मंदावते. त्यामुळे कडधान्यांचे सेवन करू नये. कारण ती पचायला जड असतात.

  • श्रावण महिन्यात चुकूनही मांसाहार करू नये.

  • बाहेरचे जंक फूड आणि तळलेले पदार्थ खाणे टाळावे.

  • श्रावणात शंकराला कच्च्या दुधाचा अभिषेक करतात. त्यामुळे कच्चे दूध पिणे टाळावे.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण नव्हे तर ‘लाडके भाऊ’ योजना; 2400 सरकारी कर्मचाऱ्यांनीही लाटले पैसे, VIDEO

Kalyan : कुटुंबीय दिवाळी साजरी करण्यात गुंग; अचानक भलंमोठं झाड ३ घरावर कोसळलं, कल्याणमधील घटना

Maharashtra Live News Update: कोकणासह पश्चिम महाराष्ट्रासाठी पुढचे ३ तास महत्वाचे,हवामान विभागाचा इशारा

Mumbai News: भयाण! अंगभर मुंग्या, भूकेने व्याकूळ बालिकेची जीवनासाठी झुंज; दोन ट्रॅव्हल्सच्यामध्ये सापडली नवजात बालिका

Kolhapur : फटाके आणायला गेले,पुन्हा परतलेच नाहीत; बहीण-भावासह पुतणीचा अपघाती मृत्यू, कांबळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर

SCROLL FOR NEXT