Sore Throat
Monsoon Health TipsSAAM TV

Monsoon Health Tips : घशाची खवखव होईल बंद; पावसाळ्यात करा 'हे' सिंपल उपाय

Sore Throat : पावसाळ्यात वातावरणातील बदलामुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढते. यामुळे घशाला इन्फेक्शन होऊन घसा खवखवायला लागतो. अशावेळी घरगुती उपाय वेदना त्वरित कमी करतात.
Published on

पावसात वातावरणात गारवा आणि ओलावा असतो. यामुळे आरोग्याची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. ताप, सर्दी , खोकला आणि घशाला इन्फेक्शन अशा आजारांना आमंत्रण मिळते. पावसाळ्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, ज्यामुळे आपल्याला इन्फेक्शनचा धोका वाढतो. पावसाळ्यात घसा खवखवण्याची समस्या सामान्य जरी असली तर खूप वेदना देते. त्यामुळे घरगुती उपायांनी तुम्ही घशाच्या वेदना कमी करू शकता.

कोमट पाण्याच्या गुळण्या

पावसाळ्यात बदलत्या वातावरणामुळे अनेकांना घशाचा संसर्ग होऊन घसा खवखवायला लागतो. विशेषतः पावसाळ्यात लहान मुलांना घशाच्या त्रास होतो. अशावेळी घरच्या घरीच दिवसातून किमान दोन ते तीन वेळा कोमट पाण्याच्या गुळण्या केल्यास त्वरित वेदना कमी होतील.

मध आणि आले

घशाची खवखव कमी करण्यासाठी मध आणि आले रामबाण उपाय आहे. तुम्ही मधाचा तुकडा चघळू शकता किंवा कोमट पाण्यामध्ये एक चमचा मध आणि आल्याचा रस मिक्स करून हे पाणी प्यावे. यामुळे घशाला आराम मिळतो. दिवसातून एकदा तरी हे पाणी प्यावे. घशाचा संसर्ग कमी होण्यास मदत मिळते. घसा मोकळा होतो. आले आयुर्वेदात औषधी मानले आहे. पावसाळ्यात हवेमध्ये थंडावा असल्यामुळे आल्याचा चहा आवर्जून प्यावा. घशाची खवखव लवकर बरी होईल.

Sore Throat
Weight Loss : व्यायाम करूनही पोट कमी होत नाही? 'या' घरगुती उपायांनी व्हाल स्लिम ॲण्ड फिट

तुळस

घशात खवखव होत असेल तर तुळशीच्या पानांचे सेवन करावे. चहामध्ये तुळशीची पानं टाकून चहा प्यावा. तसेच नुसतीही तुळशीची पाने तुम्ही खाऊ शकता. पावसाळ्यात होणाऱ्या संसर्गजन्य आजारासाठी तुळस श्रेष्ठ मानली आहे.

गरम दूध

घशाची खवखव जास्त होत असल्यास रात्री झोपताना नियमित गरम दुधामध्ये हळद टाकून प्यावे. यामुळे घशाला आराम मिळतो आणि खवखव दूर होते. गळ्याला रात्री झोपताना बदामाच्या तेलाने मालिश करावे. यामुळे घसा मोकळा होण्यास मदत मिळते.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Sore Throat
Health Tips : रात्री फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेची सकाळी चपाती करताय? वेळीच व्हा सावध! नाहीतर...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com