Mop Cleaning : पावसाळ्यात घराची स्वच्छता करताना काळाकुट्ट झालेला मॉप मिनिटांत लागेल चमकू , वापरा 'ही 'सोपी ट्रिक
घरात फरशी चमकदार मॉप स्वच्छतेसाठी खूप फायदेशीर असतो. मात्र वेळच्यावेळी मॉपची देखील स्वच्छता करणे गरजेचे आहे. घाण मॉप जास्त वेळ घरी ठेवल्यास दुर्गंधी आणि संसर्गचा धोका वाढतो. ज्यामुळे आपले आरोग्य धोक्यात येऊ शकते. घराच्या स्वच्छतेनंतर नियमित मॉपच्या कापडाची स्वच्छता करणे महत्त्वाचे आहे.
व्हिनेगर-बेकिंग सोड्याचा वापर
व्हिनेगर आणि बेकिंग सोडा मळकट डाग दूर करण्यासाठी रामबाण उपाय आहे. जर तुमचा मॉप घराची स्वच्छता करून काळाकुट्ट आणि चिकट झाला असेल तर व्हिनेगर आणि बेकिंग सोड्यामुळे त्याची चमक परत येऊ शकते. एका भांड्यात पाणी गरम करा. त्यात व्हाईट व्हिनेगर आणि बेकिंग सोडा घाला. या पाण्यात १ तास मळकट मॉप भिजवून ठेवा. त्यानंतर लिक्विड सोपचा वापर करून थंड पाण्याने मॉप स्वच्छ करून घ्या. तसेच यामुळे मॉपचा मळकटपणा आणि दुर्गंधी दूर होईल.
ब्लीचिंग पावडर
घराची स्वच्छता करताना मॉपचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे यामध्ये धोकादायक बॅक्टेरिया निमार्ण होतात. या धोकादायक बॅक्टेरियांना ब्लीचिंग पावडरच्या साहाय्याने नष्ट केले जाऊ शकते. एका बादलीमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात ब्लीचिंग पावडर मिसळा आणि मॉप ३० मिनिटे त्यात ठेवा. यामुळे सर्व जंतू निघून जातील. त्यानंतर स्वच्छ पाण्याने मॉप चांगले धुवून घ्या.
मॉपच्या कपड्याची काळजी कशी घ्यावी?
घराची स्वच्छता झाल्यावर मॉपचा कपडा व्यवस्थित ठेवून द्या. घाण कपडा असाच ठेवल्यास घातक जीवाणूंचा संसर्ग वाढतो.
पावसाळ्यात स्वच्छ केलेला मॉप सुकवताना विशेष काळजी घ्यावी. मॉप कोरड्या ठिकाणी वाळत घाला. कारण दमट हवामानामुळे मॉपला दुर्गंधी येऊ शकते.
एक ते दोन महिन्यांनी मॉपचा कापडा बदलणे गरजेचे आहे.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.