Tiles Cleaning Tips : मार्बलवर किंवा फरशीवर पिवळे डाग पडले आहेत? या पद्धतीने स्वच्छ करा

Home Hacks : घरात सर्वकाही चकाचक दिसले आणि फरशीच घाण असली तर  घर पूर्णपणे चमकत नाही.
Tiles Cleaning Tips
Tiles Cleaning TipsSaam tv

Marble Tiles Cleaning Tips : घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी घरातील फरशी किंवा मार्बल स्वच्छ असणे फार गरजेचे आहे. अन्यथा घरात सर्वकाही चकाचक दिसले आणि फरशीच घाण असली तर घर पूर्णपणे चमकत नाही.

ड्रॉइंग रूममध्ये ठेवलेला महागडा सोफा असो की, फरशी घाणीमुळे सर्व काही निस्तेज दिसू लागते. रोज मार्बल किंवा टाइल्स झाडून घेतल्यानंतरही त्यावर पिवळी घाण साचते.  त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही मार्बल किंवा टाइल्स स्वच्छ करण्यासाठी आम्ही दिलेल्या काही टिप्स (Tips) फॉलो करू शकतो. 

Tiles Cleaning Tips
Pillow Cleaning Tips : फक्त कवरच नाही तर, उशीसुद्धा आहे आरोग्याला घातक, साफ करण्यासाठी या टिप्स फॉलो करा

1. मार्बल पिवळी झाली असेल तर

  • घरातील चकाकणारी मार्बल पिवळी पडत असेल तर रोज कोमट पाण्याने (Water) फरशी पुसून घ्यावी.

  • मार्बल स्वच्छ (Clean) करण्यासाठी डिटर्जंट साबण हा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे मार्बल चमकायला लागेल.

  • भांडी घासण्यासाठी वापरणारे स्कॉच ब्राईट आणि डिटर्जंट सोल्युशनचा वापर करून मजल्यावरील किनार घासल्याने ते स्वच्छ दिसतील.

  • एका जगमध्ये कोमट पाणी घ्या. त्यात एक चमचा बेकिंग सोडा आणि दोन-तीन चमचे वाईट विनेगर मिक्स करून घ्या.

  • आता या तयार केलेल्या मिश्रणात मॉप भिजवून फरशी पुसून घ्या.  यामुळे मार्बल आणि टाइल्स सहज स्वच्छ होतात.

Tiles Cleaning Tips
Clothes Cleaning Tips : ड्रायक्लीन शिवाय सहज काढा कपड्यांवरील डाग, या ट्रिक्स फॉलो करा

2. मार्केटमधील साफसफाईचे प्रॉडक्ट

मार्केटमध्ये उपलब्ध असणारे काही क्लिनिंग प्रॉडक्ट फ्लोरवरील टाइल्स लवकर स्वच्छ करण्यासाठी तुम्ही वापरू शकता.  त्यामुळे फ्लोरवरील टाइल्स सहज स्वच्छ होतात.

3. मार्बल किंवा टाइल्स साफ करताना ही चूक करू नका

पिवळी पडलेली मार्बल किंवा घाण झालेली टाइल्स स्वच्छ करण्यासाठी कधीही ब्लिचिंग पावडर किंवा ऍसिडयुक्त प्रॉडक्टचा वापर करू नका. त्यामुळे फ्लोअर खराब होण्याची शक्यता असते. त्यासोबतच मार्बल किंवा टाइल्सवरील शाईन कमी होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com