ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आयुर्वेदात अश्वगंधा आणि मध हे महत्त्वाचे घटक आहे. औषध बनवण्यासाठी याचा वापर केला जातो.
रात्री अश्वगंधा आणि मधाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
अश्वगंधा आणि मधामध्ये अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. जे शारीरिक समस्या दूर करण्यास मदत करतात.
अश्वगंधा आणि मधामध्ये असलेले पोषक तत्व शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. यामुळे अनेक आजारांशी सामना करायची ताकत आपल्याला मिळते.
मधुमेहाची समस्या असलेल्या लोकांनी यांचे सेवन आवर्जून करावे. यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.
तुम्हाला निद्रानाशाची समस्या असल्यास रोज रात्री अश्वगंधा आणि मध खावे. यामुळे तणाव देखील दूर होतो.
पायांना सूज येत असल्यास अश्वगंधा आणि मध यांचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
नियमित अश्वगंधा आणि मध खाल्ल्यास डोळ्यांची दृष्टी चांगली राहते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.