ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
खसखस ही पोषक गुणांनी समृद्ध थंड पदार्थ आहे. खसखस नेहमी रात्री पाण्यात भिजवून सकाळी उपाशी पोटी खावी.
खसखसमध्ये आयर्न, कॅल्शियम, फायबर, प्रोटीन, व्हिटामिन्स ही पोषक तत्व मुबलक प्रमाणात आढळतात. उन्हाळ्यात उपाशी पोटी खसखस खाल्ल्यास पोटाला आणि शरीराला थंडावा मिळतो.
खसखसमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, त्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते. पचनासंबंधित कोणत्याही समस्या उद्भवत नाही.
उपाशी पोटी खसखस खाल्ल्यास शरीरातील हार्मोन्स संतुलित राहतात. परिणामी आपला तणाव कमी होतो.
खसखसमधील पोटॅशियममुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. तसेच हृदयाचे आरोग्यदेखील चांगले राहते.
खसखसमध्ये मोठ्या प्रमाणात 'व्हिटामिन ए' असते, जे आपल्या डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवते.
खसखस सर्व पोषक तत्वांनी समृद्ध असल्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास ती मदत करते. खसखसमुळे शरीराला एनर्जी मिळते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.