Health Tips : रात्री फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेची सकाळी चपाती करताय? वेळीच व्हा सावध! नाहीतर...

Dough Kept In Fridge Side Effects : सकाळी ऑफिसला जायला घाई होऊ नये. म्हणून अनेक महिला रात्री चपातीचे पीठ मळून तयार झालेली कणीक फ्रिजमध्ये ठेवून देतात. मात्र फ्रिजमधील कणीक आरोग्यास घातक ठरते. आरोग्याला होणारे दृष्परिणाम जाणून घ्या.
Dough Kept In Fridge Side Effects
Health TipsSAAM TV
Published On

आजकाल धावपळीच्या जगात सकाळी जेवण करायला महिलांना वेळ मिळत नाही. त्यामुळे बऱ्याच महिला रात्री पीठ मळून कणीक सकाळसाठी फ्रिजमध्ये भरून ठेवतात. यामुळे पिठातील पोषक घटक कमी होतात आणि आरोग्याला धोका निमार्ण होता. चपात्यांमधील पोषक तत्वांचा आरोग्याला फायदा मिळवण्यासाठी जेव्हाच्या तेव्हा चपात्यांचे पीठ मळावे आणि त्वरित चपात्या कराव्या. यामुळे फ्रेश आणि ताज्या चपात्यांचा आस्वाद घेता येतो.

फ्रिजमध्ये ठेवलेली कणीक आरोग्यास घातक, दृष्परिणाम जाणून घ्या

  • सकाळच्या चपात्यांसाठी रात्री पीठ मळून तयार झालेली कणीक सकाळपर्यंत फ्रिजमध्ये ठेवत असाल तर आरोग्याला हानिकारक आहे.

  • फ्रिजमधील कणकेच्या सकाळी चपात्या बनवल्यास गॅस, ॲसिडीटीची समस्या उद्भवते. तसेच पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतात. वारंवार पोटदुखीचा सामना करावा लागतो. बद्धकोष्ठतेचा त्रास वाढतो.

  • रात्री फ्रिजमध्ये ठेवलेल्या चपातीच्या पिठाला बुरशी लागण्याचा धोका असतो. असे बुरशी लागलेले खाल्ल्याने तब्येत खराब होण्याचा धोका असतो.

  • रात्री कणीक मळून फ्रिजमध्ये ठेवल्यास सकाळी पिठातील सर्व पोषक घटक निघून जातात. तसेच पिठावर बॅक्टेरिया निमार्ण होतात.

  • फ्रिजमधील पीठ फ्रेश नसते. तसेच या पीठाच्या रंग आणि चवीमध्ये फरक पडतो.

  • फ्रिजमधील पिठाच्या चपात्या बनवल्यास पोळी मऊ आणि लुसलुशीत होत नाही. सकाळी बनवलेल्या चपाती दुपारी कडक होतात.

  • फ्रिजमधील ओलाव्यामुळे कणीक लवकर खराब होते आणि संसर्गाचा धोका वाढतो.

Dough Kept In Fridge Side Effects
Food Stored In Fridge : सावधान! दीर्घकाळ फ्रिजमध्ये पदार्थ साठवून ठेवताय? फूड पॉयझनिंगचा धोका

गरज भासल्यास फ्रिजमध्ये कणीक ठेवताना 'हा' उपाय करा

  • चपातीचे पीठ फ्रिजमध्ये ठेवल्यास ते काळे पडण्याचा धोका असतो. यामुळे जर कधी गरज भासल्यास पिठाला तेल लावून कणीक फ्रिजमध्ये ठेवावी.

  • तसेच हवा बंद डब्यामध्ये कणीक भरून ठेवा.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Dough Kept In Fridge Side Effects
Kitchen Tips : फ्रिज वापरताना या चूका करणे टाळा, अन्यथा वेळेआधी होईल खराब

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com