Trimbakeshwar: श्रावणात त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी, मंदिर समितीचा दर्शनाबाबत मोठा निर्णय

Trimbakeshwar Temple Committee Big Decision: त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्त समितीने मोठा निर्णय घेतला आहे. भाविकांना ऑनलाइन दर्शन पास देऊन त्यावर असलेल्या वेळेतच त्यांना दर्शन देण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.
Trimbakeshwar: श्रावणात त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी, मंदिर समितीचा दर्शनाबाबत मोठा निर्णय
trimbakeshwar mandir Saam tv
Published On

अभिजीत सोनावणे, नाशिक

१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरला (trimbakeshwar temple) जाणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. आता त्र्यंबकेश्वरच्या दर्शन घेण्यासाठी भाविकांना जास्त वेळ रांगेमध्ये उभे राहावे लागणार नाही. यासाठी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्त समितीने मोठा निर्णय घेतला आहे. भाविकांना ऑनलाइन दर्शन पास देऊन त्यावर असलेल्या वेळेतच त्यांना दर्शन देण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. त्यामुळे यापुढे भाविकांना त्र्यंबकेश्वरचे दर्शन वेळेत मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाविकांच्या सोयीसाठी १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्त समितीने मोठा निर्णय घेतला आहे. भाविकांना टाईम दर्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांना ऑनलाइन दर्शन पास देऊन त्यावर असलेल्या वेळेतच दर्शन देण्याचा निर्णय मंदिर विश्वस्त समितीने घेतला आहे. येणाऱ्या सर्व भाविकांना वेळेत आणि सुखकर दर्शन व्हावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

ऑनलाइन पाससाठी भाविकांना २०० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. मंदिराची रचना बघता ठराविक भाविकांना रोज ऑनलाईन पास मिळण्याची शक्यता आहे. येणाऱ्या भाविकांसाठी स्वतंत्र मुखदर्शनाची देखील व्यवस्था करण्यात येणार आहे. मंदिराबाहेर आवारात त्र्यंबकेश्वर शिवलिंगाची हुबेहूब प्रतिकृती साकारून मुखदर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. आगामी श्रावण महिन्यात या सुविधा देण्याचा मंदिर समितीचा मानस आहे.

गेल्या काही महिन्यांपासून त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. श्रावण महिन्यात देखील २० ते २५ लाख भाविक त्रंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी येण्याचा अंदाज आहे. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता आता मंदिर समितीकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांना त्र्यंबकेश्वरच्या दर्शनला जाऊन जास्त वेळ रांगेमध्ये उभे राहावे लागणार नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com