हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला खूप मोठे महत्त्व आहे. हा महिना भगवान शंकराचा मानला जातो. या महिन्यात महिला श्रावणी सोमवारचे व्रत करतात. आपल्या नवऱ्याच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि कुटुंबाच्या भरभराटीसाठी हे व्रत केले जाते. श्रावण महिन्यात भगवान शंकर आणि माता पार्वती यांची पूजा केल्यामुळे महिलांना अखंड सौभाग्य लाभते. महिला या दिवशी उपवास करून देवाचे मनोभावे आराधना करतात.
कोणत्या रंगाची साडी श्रावणी सोमवाराला नेसणे शुभ?
श्रावणी सोमवार महिला व्रत करून शंकराची पूजा करतात. या दिवशी महिलांनी हिरव्या रंगाची साडी नेसणे शुभ मानले जाते. हिरवी साडी नेसून साज श्रृंगार करून महिलांनी या दिवशी तयार व्हावे. कारण महिला देवीचे रुप असते आणि देवीने शुभ प्रसंगी नेहमी फ्रेश आणि प्रसन्न दिसणे महत्वाचे असते. श्रावण महिना हा पावसाळ्यात येत असल्यामुळे निसर्गात हिरवळ पाहायला मिळते. तसेच देवीला देखील हिरवा रंग खूप आवडतो. हिरवा रंग सकारात्मकतेचे प्रतीक आहे. यामुळे महिलांनी उपवासादरम्यान हिरव्या रंगाची साडी नेसणे शुभ मानले जाते.
साज श्रृंगार
महिलांनी श्रावणी सोमवाराला पारंपारिक पद्धतीने साडी नेसावी. उपवासादरम्यान शरीर थोडे अशक्त असू शकते. यामुळे थोडी हलकी पण श्रावणी सोमवार आला पारंपारिक पद्धतीने काठापदराची साडी नेसावी. तुम्हाला आवडत असल्यास नऊवारी साडी नेसले उत्तम राहील. साडीवर छान केसांचा अंबाडा घालून मोगऱ्याचा गजरा माळावा. नाकातून नथ, पायात पैंजण, हातात बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र घालून साज श्रृंगार करावा. पावसाळ्यात जास्त भडक मेकअप करू नये. कारण दमट हवामानामुळे मेकअप खराब होण्याची शक्यता जास्त असते. हलका मेकअप करावा. पावसाळ्यात चेहरा मॉइश्चराईज करायला विसरू नये. डोळ्यांचा मेकअप खूप हाई लाइट होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. उपवास जरी असला तरी महिला घरच्या कामांमध्ये असतात त्यामुळे शरीराला घाम येऊ शकतो. यामुळे शक्यतो वाटरप्रूफ मेकअप करावा. जेणेकरून संपूर्ण दिवस तुम्ही सुंदर आणि तजेलदार दिसाल.
डिस्क्लेमर : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.