Sankashti Chaturthi : संकष्टी चतुर्थीला गणेशाला दाखवा तिळगुळाचे मोदक, नैवेद्य खाऊन बाप्पा होईल खुश

Tilgul Modak Recipe : सर्वांचे दुःख दूर करणाऱ्या विघ्नहर्ता गणपतीची आज संकष्टी चतुर्थी आहे. संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाला तिळगुळाच्या मोदकांचा नैवेद्य दाखवा. सोपी, स्वादिष्ट रेसिपी जाणून घ्या.
Tilgul Modak Recipe
Sankashti ChaturthiSAAM TV
Published On

संकष्टी चतुर्थीला महिला गणेशाची मनोभावे पूजा करून उपवास करतात. घरात सुख शांती लाभावी आणि कुटुंबातील सदस्यांना चांगले आरोग्य लाभावे हेच त्या मागील उद्देश असतो. संध्याकाळी चंद्राला पाहून देवाची पूजा करून उपवास सोडला जातो.

देवाची पूजा करताना सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे नैवेद्य. गणपतीला मोदक खूप आवडतात. त्यामुळे आज आपण मोदकाचा नवीन प्रकार शिकूया. तसेच नैवेद्य हे सात्विक भोजन असते. त्यामुळे नैवेद्य बनवताना विशेष काळजी घ्यावी.

नैवेद्य दाखवताना 'या' चुका टाळा

  • नैवेद्य करताना तेलाचा वापर टाळून तुपाचा वापर करावा. कारण तूप हे सात्विक असते.

  • देवाला ठेवलेला नैवेद्य त्वरित काढून घेऊ नये. थोडा वेळ तो तसाच देवासमोर राहू द्यावा.

  • विशेषतः पूजेच्या नैवेद्याचे ताट लहान मुलांना खाऊ द्यावे. कारण लहान मुलं ही देवाचे रूप असतात.

  • संकष्टी चतुर्थीला नैवेद्य बनवताना तुळशी पत्र घालू नये.

  • देवाला नैवेद्य दाखवल्यावर तोच नैवेद्य गाय मातेलाही दाखवावा. त्यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन आयुष्यात भरभराट होईल.

Tilgul Modak Recipe
Pav Bhaji Without Tomato : टोमॅटो महागले, तरी पावसाळ्यात बनवा चटपटीत पावभाजी! वापरा 'ही' भन्नाट युक्ती

तिळगुळाचे मोदक

साहित्य

  • पांढरे तीळ

  • गूळ

  • तूप

  • ड्रायफ्रुट्स

  • वेलची पावडर

कृती

मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम तुपामध्ये मंद आचेवर हलके तीळ भाजून घ्या. यानंतर भाजलेले तीळ मिक्सरला छान बारीक करून घ्या. आता तिळामध्ये गूळ घालून विरघळेपर्यंत ढवळत रहा. त्यानंतर यात तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्सची पावडर आणि वेलची पावडर घालावी. हे मिश्रण छान घट्ट एकजीव करून घ्या. आता हे मिश्रण मोदकाच्या साच्यात भरून मोदक तयार करून घ्यावे. स्वादिष्ट गोड तिळगुळाचे मोदक तयार झाले.

संकष्टी चतुर्थीला 'ही' कामे करू नये.

  • तुळशीची पानं तोडू नका.

  • मद्यपान करू नका.

  • विशेषतः संकष्टी चतुर्थीला पशु पक्षांना त्रास देऊ नये.

  • संकष्टी चतुर्थीला ब्राह्मणांचा आणि मोठ्यांचा अनादर करू नये.

  • संकष्टी चतुर्थीला खोटे बोलणे टाळावे. कारण यामुळे करिअर मध्ये अडथळे येऊ शकतात.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Tilgul Modak Recipe
Guru Purnima Special : गुरुपौर्णिमेनिमित्त भरपूर गुलाब जमा झाले? पाकळ्यांपासून बनवा गुलकंद, वाचा रेसिपी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com