Guru Purnima Special : गुरुपौर्णिमेनिमित्त भरपूर गुलाब जमा झाले? पाकळ्यांपासून बनवा गुलकंद, वाचा रेसिपी

Gulkand Recipe : गुरुपौर्णिमेनिमित्त घरी भरपूर गुलाबाची फुलं गोळा झाली असतील. तर घरी झटपट गुलकंद बनवा. चांगल्या आरोग्यासाठी घरी बनवलेले गुलकंद फायदेशीर ठरते. कारण त्यात केमिकलचा वापर नसतो.
Gulkand Recipe
Guru Purnima Special SAAM TV
Published On

आज गुरु आणि शिष्याच्या प्रेमाचा दिवस आहे. शिष्य आपले गुरुप्रती प्रेम आणि भावना आज व्यक्त करतात. शिष्य गुरूंना वेगवेगळ्या भेट वस्तू देतात. त्यांच्या आवडीचे पदार्थ खाऊ घालतात. तसेच गुरूपौर्णिमेच्या दिवशी मोठ्या प्रमाणात शिष्यांकडून गुरूंना गुलाबाचे फुलं दिली जातात.

गुरूपौर्णिमेनंतर गुरूंकडे गुलाबाच्या फुलांचा खजिना होतो. अशावेळी एवढ्या गुलाबांचे करायचे काय? हा प्रश्न पडतो. किती दिवस गुलाब केसात माळले जाणार, कारण गुलाब दीर्घकाळ ठेवल्यास कोमेजू शकतात. अशावेळी गुलाबाच्या फुलांचा गुलकंद बनवणे योग्य राहील. घरी बनवलेले गुलकंद हे केमिकल फ्री असल्यामुळे आरोग्याला नुकसान होणार नाही. गुलकंदमुळे शरीरातील उष्णता कमी होते. तसेच बुद्धी तीक्ष्ण होते. पोटासंबंधित समस्या असल्यास गुलकंद फायदेशीर ठरतो. उदा. बद्धकोष्ठता, ॲसिडीटी

गुलकंद

साहित्य

  • गुलाब

  • खडी साखर

  • वेलची पावडर

  • बडीशेप

  • मध

Gulkand Recipe
Guru Purnima 2024 : गुरु आणि शिक्षक दोघांमध्ये फरक काय?

कृती

घरी गुलकंद तयार करण्यासाठी सर्वप्रथम गुलाबाच्या पाकळ्या काढून स्वच्छ धुवून घ्या. नंतर वेलची आणि बडीशेप मिक्सरला बारीक करून घ्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, छान गुलकंद बनवण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या आणि खडी साखर यांचे समान प्रमाण असावे. आता मंद आचेवर गॅस ठेवून हे सर्व मिश्रण ५ मिनिटे शिजवून घ्या. त्यानंतर यामध्ये एक चमचा मध घालून मिक्स करा. मिश्रण वितळून जॅम सारखे करा. अशाप्रकारे गुलकंद तयार झाला. आता एका काचेच्या बरणीत गुलाब पाकळ्या टाका. त्यावर बनवलेला गुलकंद घाला. परत गुलाब पाकळ्या टाकून बरणी बंद करा. बरणीला हवा लागणार नाही याची काळजी घ्या.

Gulkand Recipe
Guru Purnima 2024 : तुमच्या आयुष्यातील खरा गुरु कोण, कसं ओळखायचं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com