Cardamom Sharbat Recipe
Cardamom (Elaichi) Sharbat SAAM TV

Cardamom (Elaichi) Sharbat : आता कोणत्याही ऋतूत 'वेलची'च्या सरबतासोबत झटपट ताजेतवाने व्हा, रेसिपी जाणून घ्या..

Cardamom Sharbat Recipe: छोटीशी वेलची रिफ्रेशमेंट म्हणून आपण नेहमीच खातो. याच वेलचीने शरीराला दीर्घकाळ ताजेतवाने ठेवणारे सरबत बनवूया. जाणून घ्या रेसिपी...

Cardamom Sharbat : भारतीय स्वयंपाक घरात आढळणारा एक छोटासा मसाला आरोग्यासाठी मोठा फायदेशीर ठरतो. तो म्हणजे छोटीशी 'वेलची' जी, अनेक औषधी गुणांनी समृद्ध आहे. वेलची खाल्ल्यास त्वरित ताजेतवाने वाटते. वेलचीमध्ये कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर, पोटॅशियम, व्हिटामिन्स हे पोषक घटक मोठ्या प्रमाणात आढळतात. वेलचीचे सेवन आरोग्याच्या अनेक समस्यांपासून आपले संरक्षण करते.

शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी तुम्ही बाजारातील अनेक एनर्जी ड्रिंकचा आस्वाद घेत असाल. उदा. ओआरएस. पण घरगुती वेलचीच्या सरबतमुळे तुम्ही झटपट ताजेतवाने व्हाल आणि दिवसभर शरीरात ऊर्जेची कमतरता भासत नाही. वेलचीचे सरबत शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते. वेलचीचे सरबत प्यायल्यास गॅस आणि ॲसिडिटीची समस्या दूर होते. वेलची पोटाला थंडावा देते. कोणत्याही ऋतूत तुम्ही या थंडगार सरबताचा आस्वाद घेऊ शकता.

झटपट घरगुती एनर्जी ड्रिंकची रेसिपी जाणून घेऊयात..

वेलचीचे सरबत तयार करण्यासाठी लागणारे साहित्य :

वेलचीचे सरबत तयार करण्यासाठी वेलची पावडर, काळ मीठ, लिंबूचे तुकडे आणि रस, साखर, थंड पाणी, बर्फाचे तुकडे इत्यादी घटकांची आवश्यकता असते.

Cardamom Sharbat Recipe
Jaipur Tourism : 'या' पावसाळ्यात करा 'पिंक सिटी'ची सफर; अनुभवा अद्भुत निसर्गाचे सौंदर्य

वेलचीचे सरबत तयार करण्याची कृती :

वेलचीचे सरबत बनवण्यासाठी सर्वप्रथम वेलची वाटून घेऊन त्याची पावडर तयार करावी. त्यांनतर एका भांड्यात ५-६ कप थंड पाणी टाकावे. या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून ते छान मिक्स करून घ्यावे. आता या साखरेच्या पाण्यामध्ये काळ मीठ, लिंबाचा रस आणि वेलची पावडर टाकून छान एकत्र करून घ्यावे. अशाप्रकारे तुमचे थंडगार वेलचीचे सरबत तयार झाले. लिंबाची स्लाइसने या सरबताला सजवावे आणि याचा आस्वाद घेताना यात थोडे बर्फाचे तुकडे घालावे.

Cardamom Sharbat Recipe
Monsoon Hair Care Tips : पावसात 'अशी' घ्या केसांची काळजी; केस कायम राहतील स्मूथ अँड सिल्की

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com