Guru Purnima 2024 : तुमच्या आयुष्यातील खरा गुरु कोण, कसं ओळखायचं?

Real Guru Signs : आज आपल्याला घडवणाऱ्या गुरुला अभिवादन करण्याचा दिवस आहे. संपूर्ण जगभरात गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी केली जात आहे. चला तर ओळखा तुमच्या आयुष्यातील खरा गुरु कोण?
Real Guru Signs
Guru Purnima 2024SAAM TV
Published On

आज २१ जुलै जगभरात गुरूपौर्णिमेचा जल्लोष पाहायला मिळत आहे. काळानुरुप गुरु शिष्याचे नाते बदलत गेले आहे. पूर्वी या नात्यात आदरपूर्वक भीती होती. आता मात्र याची जागा आदरपूर्वक मैत्रीने घेतली आहे. गुरूपौर्णिमा ही शिक्षकांपर्यंत मर्यादित न राहता. आयुष्यात आपल्याला घडण्यासाठी मदत करणाऱ्या त्या प्रत्येक एका व्यक्तिपर्यंत व्यापक झाली आहे. गुरु शिष्याचे नाते हे कायम समान पातळीवर असणे गरजेचे आहे. तर मग आज तुमच्या आयुष्यातील अशाच गुरूंना ओळखा आणि त्यांच्या प्रति आपले प्रेम व्यक्त करा.

खऱ्या गुरुची ओळख

  • कोणताच गुरु आपल्या शिष्यात कधीही भेदाभेद करत नाही. तो सर्वांना एकाच दृष्टीकोनातून पाहतो. सर्वांना समान न्यान आणि समान वागणूक देतो.

  • गुरु आणि शिष्यामध्ये एका मर्यादेपर्यंत भावनिक गुंतवणूक असते. जी तुम्हाला कायम मदत करते. कारण गुरुचे शिष्याला भावनिकरित्या भक्कम करणे हे देखील काम असते.

  • गुरु शिष्यांकडून कधीच कोणती अपेक्षा ठेवत नाही. तो कायम शिष्याला योग्य मार्ग दाखवण्याच्या प्रयत्नात असतो. खरा गुरु नेहमी शाब्दिक बोलण्यापेक्षा प्रात्यक्षिक करून घेण्यावर भर देतो.

  • बऱ्याचदा गुरुचे तिखट बोल आपल्याला सहन होत नाहीत आणि राग येतो. पण तुम्हाला योग्य दिशा दाखवण्यासाठी गुरुचे कठोर वागणे गरजेचे आहे.

Real Guru Signs
Guru Purnima Special Dessert : गुरुपौर्णिमेनिमित्त घरच्याघरी बनवा बेसनाचे लाडू; गुरू देखील करतील कौतुक
  • खरा गुरु कधीच इतरांची निंदा करत नाही. किंवा आपल्या शिष्यांची तुलना करत नाही. तो कायम समानतेवर भर देतो.

  • गुरु कधीच प्रसिद्धीसाठी काम करत नाही. तो कायम प्रसिद्धीपासून लांब पळतो. त्याला फक्त शिष्याचा विकास हवा असतो.

  • गुरु आपल्या शिष्याचे कधीही वाईट विचार करत नाही. नेहमी त्यांच्या चांगल्यासाठी प्रयत्नात राहतो.

Real Guru Signs
Guru Purnima 2024: 'या' कालावधीत करा गुरुंची पुजा; गुरूपैर्णिमेचा शुभ मुहूर्त काय? वाचा सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com