Malik Film : '१२ वी फेल' फेम मेधा शंकर दिसणार ॲक्शनपटात; राजकुमार रावसोबत करणार एकत्र स्क्रीन शेअर

Medha Shankar And Rajkumar Rao Film : 12th Failची श्रद्धा अर्थात अभिनेत्री मेधा शंकरने आपल्या एक्टिंगने सर्वांना वेड लावलं. मेधा पुन्हा प्रेक्षकांचं मन जिंकायला रुपेरी पडद्यावर येतेय.
Malik Film : '१२ वी फेल' फेम मेधा शंकर दिसणार ॲक्शनपटात; राजकुमार रावसोबत करणार एकत्र स्क्रीन शेअर
Rajkummar Rao and Medha Shankar MovieSaam Tv

आयुष्यात कितीही अपयश आलं तरी कायम रिस्टार्टचा पर्याय आपल्याकडे असतो. आयुष्यात हा मोलाचा संदेश देणारा 12th Fail सिनेमा.. या सिनेमानं आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन प्रेक्षकांना दिला. 12th Fail ची श्रद्धा अर्थात अभिनेत्री मेधा शंकरला 12th Fail सिनेमानंतर आता एक मोठा ब्रेक मिळालाय.

पुलकित दिग्दर्शित 'मलिक' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्यात बहुआयामी अभिनेता राजकुमार राव लीड रोलमध्ये दिसणार आहे. तर त्याच्यासोबत अभिनेत्री मेधा शंकर दिसणार आहे. 12th Fail नंतर ही तिची पहिलीच फिल्म असेल.

Malik Film : '१२ वी फेल' फेम मेधा शंकर दिसणार ॲक्शनपटात; राजकुमार रावसोबत करणार एकत्र स्क्रीन शेअर
Mirzapur 3 Online Leaked : 'मिर्झापूर ३' सीरीजचे सर्व एपिसोड ऑनलाईक लीक, निर्मात्यांना मोठा झटका

भूमी पेडणेकर स्टारर 'भक्षक' सिनेमामुळे दिग्दर्शक पुलकित चांगलाच चर्चेत आलाय. त्याच्या 'मलिक' या चित्रपटात मेधा शंकर आणि राजकुमार राव या नव्या जोडीला ऑनस्क्रीन पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.

ॲक्शन फिल्म असल्याने राजकुमारने आपल्या फिटनेसवर काम करायला सुरुवात केलीये. तो या सिनेमात मस्क्युलर फिजीकमध्ये दिसणार आहे. मेधा या सिनेमात एक हुशार, शांत, संवेदनशील व्यक्तीच्या भुमिकेत दिसणार आहे.

'मलिक' ह्या सिनेमाचं शुटिंग लखनऊ, वाराणसी या शहरातील विविध लोकेशन्सवर होणार आहे. अवघ्या तीन महिन्यात या सिनेमाचं शुटींग पूर्ण करण्याचं चॅलेंज पुलकित समोर आहे. याच वर्षी सप्टेंबर महिन्यात शुटिंगला सुरुवात होणार आहे.

Malik Film : '१२ वी फेल' फेम मेधा शंकर दिसणार ॲक्शनपटात; राजकुमार रावसोबत करणार एकत्र स्क्रीन शेअर
Bigg Boss Marathi 5 Promo : 'बिग बॉसच्या किचनमध्ये भांड्याला भांडं लागणार...', रितेश देशमुखच्या स्टाईलने 'बिग बॉस मराठी ५'वा सीझन गाजणार

12th Fail मेधाचा पहिला सिनेमा नव्हता

12th Fail सिनेमाने मेधा शंकरला प्रसिद्धी मिळाली असली तरी हा काही तिचा पहिला सिनेमा नाही. 12th Fail सिनेमात श्रदधा जोशीची भूमिका करणारी मेधा शंकर ही खरी मराठी कुटुंबातील आहे. मात्र ती दिल्लीत वाढली. मेधा अभिनेत्री असण्यासोबतच गायिका आणि मॉडेल पण आहे. तिने करिअरची सुरुवातच मॉडलिंग आणि टिव्ही जाहिरातीतून केली. 2015 ला 'विथ यू फोर यू ऑलवेज' या शॉर्ट फिल्मने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. नंतर‘दिल बेकरार’ही वेब सीरीज तर ब्रिटिश हिस्‍टोरिकल ड्रामा टीवी सीरीज ‘बीचम हाउस’ मध्येही मेधा दिसली होती. ‘शादिस्तान’ सिनेमातून मेधाने बॉलीवुडमध्ये डेब्यू केलाय.

Malik Film : '१२ वी फेल' फेम मेधा शंकर दिसणार ॲक्शनपटात; राजकुमार रावसोबत करणार एकत्र स्क्रीन शेअर
Shah Rukh Khan Post : टीम इंडियाची विजयी परेड पाहून शाहरूख खान भारावला, म्हणाला, "मन गर्वाने..."

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com