Chetan Bodke
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या दिवशी 'राष्ट्रीय युवा दिन' साजरा केला जातो.
स्वामी विवेकानंदांचे विचार जसे तरुणांना आयुष्यामध्ये पुढे जाण्याची जशी प्रेरणा देतात त्याचप्रमाणे बॉलिवूडमधील अनेक चित्रपटही तरुणांना खूप काही शिकवण देऊ जातात.
आजच्या 'राष्ट्रीय युवा दिन' निमित्ताने आपण बॉलिवूडमधील प्रेरणादायी चित्रपटांविषयी जाणून घेणार आहोत.
आजच्या तरुणाईसाठी हा चित्रपट एक आयडियल मानला जातो. सुशांतने या चित्रपटातून तरुणाईला दिलेला संदेश हा नेहमीच प्रेरणादायी ठरला.
विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित '12वी फेल' चित्रपटामध्ये आपल्याला १२ वी नापास झालेले मुलं भविष्यात सनदी अधिकारी बनण्यासाठी कशाप्रकारे कसरत करतात, हे या चित्रपटातून दाखवण्यात आलंय.
झोया अख्तर दिग्दर्शित 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' हा चित्रपटदेखील तरुणाईवर आधारित चित्रपट आहे. चित्रपटाची कथा तीन मित्रांची असून खूप मोलाचा संदेश चित्रपटातून दिला.
'जाने तू या जाने ना' चित्रपट २००८ मध्ये रिलीज झाला. चार मित्रांची गोष्ट, त्यांच्यातील बाँडिंग आणि शेअरिग, वेगळ्या मित्रत्वाची गोष्ट या चित्रपटातून पाहायला मिळतेय.
२००६ मध्ये रिलीज झालेल्या 'रंग दे बसंती' चित्रपटाने तरुणाई, त्यांची स्वप्नं, तरुणाईंची विचार करण्याची पद्धत यासर्व गोष्टींवर वेगळ्या प्रकारे भाष्य करण्याचा प्रयत्न दिग्दर्शकानं केला होता.